सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | कसमादेचे वैभव असलेल्या २८,००० सभासद व शेकडो कामगारांच्या रोजी रोटीचे साधन असलेला वसाका कर्जाच्या खाईत लोटला गेला. संपूर्ण कसमादेचे आर्थिक चक्र फिरवणारी संस्था म्हणून नावारूपाला आलेला कारखाना अखेर बंद पडुन थकित कर्जाच्या वसुलीसाठी निकालात निघाला आहे. अनेक कुटुंबाना रोजगार उपलब्ध करून देणारी मातृसंस्था म्हणून या सहकारी साखर कारखान्याकडे पाहिले जाते. कर्मवीर कै. ग्यानदेव दादा देवरे यांनी स्व. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या सहकार्याने आपल्या कसमादेच्या ग्रामीण भागाचा विकास व्हावा यासाठी भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून वसाका सारख्या सुंदर कारखण्याची विठेवाडी येथील माळरानावर निर्मिती केली.
एक एक पै सभासदांकडून जमा केले. त्यासाठी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून भाग भांडवल जमा केले. हजारो सभासदांना कारखान्याचे मालक बनवले. स्वर्गीय ग्यानदेव दादा देवरे यांनी लावलेल्या या रोपट्याचे कालांतराने त्याचे वटवृक्षात रूपांतरही झाले. एक चांगले स्वप्न प्रत्यक्षात अस्तित्वात आणले गेले. पण दादांच्या निधनानंतर कारखान्याच्या वैभवात कै. शशीकांत पवार, कै. शांताराम तात्या, कै.डॉ.डी.एस.आहेर, डॉ.जे.डी.पवार यांनी त्यांच्या पद्धतीने भर घालण्याचा प्रयत्न केला. विस्तारीकरण आसवनी प्रकल्प उभारण्यात आले. त्यासाठी भरमसाठ खर्च ही झाला.
Vasaka | वसाकाच्या विक्री प्रक्रीयेविरोधात संस्थापक अध्यक्षांचे वारसदार आक्रमक
अन् कारखान्याला उतरती कळा लागली
भविष्याच्या दृष्टीने घेण्यात आलेल्या काही निर्णयांमुळे म्हणा किंवा नैसर्गिक आपत्तिमुळे तसेच शासनाच्या काही धोरणांमुळे, कारभार करत असताना नियोजनात झालेल्या गंभीर चुकांमुळे वसाकाची वाट लागली. हे सत्य सर्व कामगार तसेच सभासदांना मान्य करावेच लागेल. त्याचा फटका सर्वसामान्य सभासद, कर्मचारी, उस उत्पादक शेतकरी, व्यवसायिक, तोडणी कामगार, ठेकेदार या सगळ्यांनाच बसला. मध्यंतरी सन १५/१६ मध्ये मोठा गाजावाजा करत तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गव्हाण पुजा करून बंद असलेला वसाका धुमधडाक्यात चालु ही केला होता.
सभासदांनी व कामगारांनी भरभरून योगदान ही दिलं होतं. परंतु कामगारांना व सभासदांना वेळेवर पेमेंट अदा न करता आल्याने साखरेवर जप्तीची कारवाई करावी लागली. पुढे धाराशिव प्रशासनाने काही प्रमाणात उसाचे पेमेंट व कामगारांचं थकित पेमेंट अदा केल्यानंतर वसाका हा पंढरपूर येथील उद्योजक अभिजीत पाटील यांनी २८ वर्षासाठी (२५+३=२८) चालवायला घेतला. त्यांनाही कारखाना धड चालवला नाही. त्यांनी कामगारांची थकित व चालु देणी दिली नाही, उस उत्पादकांचे पैसे दिले नाही, उसतोडणी व वाहतूक ठेकेदाराची देणी वेळेवर दिली नाही, आपल्या सर्व सभासद व कामगाराच्या भावना ह्या कारखान्यात गुंतल्या असल्याने आपण त्यांना सर्वतोपरी सहकार्य करायला तयार होतो. तरी पण अभिजित पाटलांनी करार तडकाफडकी रद्द केला.
Dada Bhuse | विद्यार्थ्यांना करियर निवडताना स्वातंत्र्य द्या; मंत्री दादा भुसेंचे पालकांना आवाहन
२४ जुलै रोजी उपोषण
दुर्दैवाने परत कारखाना बंद पडला. त्यामुळे बँकसह इतर देणे व कामगारांचे थकित देणे. यांचे दायित्व वाढल्यामुळे नाईलाजाने सदर कारखाना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने विक्रीस काढला. केवळ शिखर बँकच नाही तर इतर ही राष्ट्रीयकृत बँकाचे शेकडो कोटी रुपये कारखान्याकडे घेणी आहेत. यातुन आपल्याला आपला कारखाना वाचवायचा आहे. त्यासाठी बुधवारी (दि.२४) रोजी कारखाना साईट वर उपोषण करून कारखाना विक्रीस तीव्र विरोध करायचा असून आपण हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून सहभागी व्हावे ही, असे आवाहन उमराणा बाजार समितीचे माजी सभापती विलास देवरे, देवळा बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, मविप्रचे संचालक विजय पगार,
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष पंडितराव निकम, उसउत्पादक संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रभाकर पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव, जिल्हाध्यक्ष राजेंद्र शिरसाठ, युवाध्यक्ष तुषार शिरसाठ, कळवण तालुकाध्यक्ष रामकृष्ण जाधव, उपजिल्हाध्यक्ष रविंद्र शेवाळे, रमेश आहीरे, शेतकरी संघटनेचे नेते फुला जाधव, माणिक निकम, शिवसेनेचे(उद्धव ठाकरे) तालुकाध्यक्ष सुनिल पवार, एकनाथ पगार, देवळा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दिनकर निकम, महेंद्र आहेर, पि.डी निकम, संजय सावळे, बाळासाहेब सोनवणे, दिपक निकम, राजेंद्र जाधव, संजय जाधव, कैलास जाधव, प्रहार शेतकरी संघटनेचे बागलाण तालुकाध्यक्ष तुषार खैरनार, व्यंगचित्रकार किरण मोरे, संजय सोनवणे, वसाका जमीन धारक संघटनेचे शशीकांत पवार, नाना पवार, वसाका मजदुर युनियन पदाधिकारी आदींनी केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम