सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | महात्मा गांधी तटांमुक्ती समीतीच्या देवळा तालुकाध्यक्षपदी वाजगाव ता.देवळा येथील विनोद देवरे यांची सोमवार (दि. २४) रोजी सर्वानूमते बिनविरोध निवड करण्यात आली. गावातील वाद सोडवत व सुसंवादाचा सेतू उभारण्यात गावागावातील तंटामुक्त समितीची मोलाची भूमिका असते. हे कार्य करताना या समिती अध्यक्षांमध्ये संवादाचा पूल असावा, परस्परांशी चर्चा करत मार्गदर्शन मिळावे व तालुक्याचे एक संघटन असावे या पार्श्वभूमीवर सर्व तंटामुक्त समिती अध्यक्षांना एकत्रित करत हा नवा उपक्रम चालू करण्यात आला आहे.
तालूक्यातील सर्व गावातील तटांमुक्ती समीतीच्या अध्यक्षानी एकञ येत तालुका समितिची स्थापना केली असून देवळा येथील शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात घेण्यात आलेल्या बैठकीत तालुकाध्यक्षांची निवड करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी भऊर येथील तटांमुक्ती समीतीचे अध्यक्ष सुभाष पवार हे होते. या तालुका समितीच्या उपाध्यक्षपदी वरवंडीचे चंद्रकांत चव्हाण, महेंद्र पाटील (तिसगाव), डाॅ.चदकांत पाटील (वासोळ), सरचिटणीस म्हणून विलास भामरे (सरस्वतीवाडी), चिटणीस – राजेंद्र निकम (विठेवाडी), संघटक – गणेश देवरे (दहिवड), प्रशांत खैरनार (गिरणारे),
Swabhimani | स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी राज्यकार्यकारणी समोर ठेवला राजीनामा
कोषाध्यक्ष – दिपक जाधव (गुंजाळनगर), संपर्कप्रमुख – रविद्र बर्व (कनकापूर), सल्लागारपदी – केदा शिरसाठ (मेशी), डाॅ.निंबा भामरे (खुंटेवाडी), दिलीप देवरे (उमराणे), सुभाष पवार (भऊर), मोठाभाऊ सावंत (डोंगरगाव) आदींची निवड करण्यात आली. यावेळी कडू भदाणे (कापशी), मधूकर ठाकरे (कुंभार्ड), समाधान सोनजे (पिंपळगाव), जनार्दन ठुबे (मटाणे), दिलीप गांगुर्ड (फुलेनगर), प्रताप ठाकरे (वाखारी), जिभाऊ बच्छाव (माळवाडी), रमेश सोनवणे (शेरी), चंद्रभान आहिरे (देवपुरपाडे), कारभारी पवार (सावकी), योगेश पवार (चिचंवे), दादाजी आहिरे (महालपाटणे), पुंजाराम पवार (निबोळा) आदी उपस्थित होते.
“या तालुका समितीच्या माध्यमातून गावागावातील तंटे, वाद यावर चर्चा करत एकमेकांना सहाय्य करणे व तंटामुक्त तालुका म्हणून त्या दिशेने कार्यरत राहणे हे आमचे उद्दिष्ट आहे.” – विनोद देवरे, वाजगाव
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम