Deola | देवळा शिवसेनेच्या वतीने चित्रा वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

0
20
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |देवळा शिवसेनेच्या वतीने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी (दि १३) रोजी येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्नांना फळे वाटप करण्यात आले. तसेच भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याबाबत निषेध व्यक्त करण्यात येऊन त्यासंदर्भात सहायक पोलीस उपनिरीक्षक दीपक पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले.

चित्रा वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. याप्रसंगी तालुकासंघटक प्रशांत शेवाळे, सहसंपर्क प्रमुख विजय जगताप, उपतालुकाप्रमुख विलास शिंदे, विभागप्रमुख गोरख गांगुर्डे, शहरप्रमुख विश्वनाथ गुंजाळ, शहर संघटक देवा चव्हाण, उपशहरप्रमुख एस.के.शिंदे, जितेंद्र भामरे, शाखाप्रमुख दादा मकोडी, युवासेना उपशहरप्रमुख गोविंदा सोनवणे आदि शिवसैनिक उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here