सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | तालुक्यातील पूर्वभागातील जनतेला रामेश्वरपासून पुढे झाडी वाढीव उजव्या कालव्याद्वारे पुरपाणी सोडण्यात यावे. या मागणीसाठी आज बुधवार (दि. १२) रोजी सांगवी ता. देवळा येथे हरीसिंग ठोके यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या उपोषणाला आणि मागणीला मेशी, दहिवड आदी पूर्व भागातील गावांनी पाठिंबा दर्शविला आहे. देवळा तालुक्यातील पूर्व भागात यावर्षी तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली. जवळपास सर्वच गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. चनकापूर उजवा कालवा पुढे रामेश्वरपासून वाढीव झाडी एरंडगाव उजव्या कालव्यापासून लाभक्षेत्रातील शेतकरी वंचित आहेत. त्यांना न्याय मिळावा यासाठी उपोषणाचे हत्यार
उपसले असून, प्रशासनाने याची दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
Deola | ‘या’ आहेत प्रमुख मागण्या..
यात प्रामुख्याने झाडी धरणात यावर्षी पूर पाणी सोडण्यात यावे, चनकापूर ते झाडी एक्स्प्रेस कालव्याला मान्यता आहे. तर तो त्या पद्धतीने तयार करण्यात यावा, चनकापूर ते झाडी कालव्याची रुंदी करणे व अस्तीकरण करून वहन क्षमता वाढविण्यात यावी, चनकापूर ते झाडी हा रामेश्वर धरणातून बायपास करून पूर्ण कालवा झाडीपर्यंत एक्सप्रेस करण्यात यावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी प्रहारचे मालेगाव तालुका अध्यक्ष नंदू शेवाळे, शेखर पगार, दहिवड येथील संजय देवरे, कुंभार्डे येथील सतिष ठाकरे, मेशी येथील केदा शिरसाठ आदी लाभक्षेत्रातील ग्रामस्थांनी उपोषणस्थळी भेट देऊन आपला पाठींबा दर्शविला आहे.
Deola | देवळा तालुक्यात वीज पडल्यामुळे दोघांचा मृत्यू तर, कांदा शेड्स व घरांचेही नुकसान
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम