Malegaon | मालेगावातील ‘त्या’ अल्पवयीन मुलीच्या हत्येचा खटला फास्टट्रॅक कोर्टात; मंत्री भुसेंनी शब्द पाळला 

0
45
Malegaon
Malegaon

मालेगाव : मालेगाव तालुक्यातील अजंग येथे (दि. १४ मे) रोजी अल्पवयीन मुलगी भाविका (रिया) ज्ञानेश्वर महाले (वय ८ वर्ष) हीचे घरातून अपहरण झाले होते. याबाबत पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलीसांनी शोध घेतला आणि (दि. १५ मे) रोजी तिचा मृतदेह गावाजवळील मोसम नदीपात्रालगत असलेल्या विहीरीत संशयास्पदरित्या आढळुन आला. त्यामुळे या बालिकेची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत संतप्त नातेवाईकांसह ग्रामस्थांनी रास्ता रोको केले. दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे.  (Malegaon)

Malegaon | मंत्री भुसे यांनी शब्द पाळला 

पोलीसांनी या घटनेचा तपास करत या प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे. तरी सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बालिकेच्या कुटुंबास न्याय मिळावा म्हणुन या घटनेची सुनावणी ही फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात यावी अशी मागणी मंत्री दादाजी भुसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी विधी व न्याय विभागाला आदेश दिले असून हा खटला आता फास्टट्रॅक कोर्टात चालणार आहे. यामुळे मृत मुलीच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याचा आपला शब्द मंत्री भुसे यांनी पाळला आहे.(crime news)

वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलीच्या वडिलांच्या पुरवणी जबाबावरून या प्रकरणी अपहरण करून तिचा खून व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह विहिरीत टाकल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आठ वर्षीय मुलीचा खून झाल्याने अजंग-वडेलसह तालुक्यातील ग्रामस्थांच्या भावना तीव्र होत्या.

Nashik News | मालेगावात ८ वर्षीय मुलीचा मृतदेह विहिरीत; ग्रामस्थांकडून रास्ता रोको

मंत्री दादाजी भुसे यांनी दिले होती हमी 

सलग दोन दिवस नामपूर रस्त्यावर रास्तारोको आंदोलन देखील गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले होते. संशयितांना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिकाही कुटुंबीय व ग्रामस्थांनी घेतली होती. यावेळी मंत्री दादाजी भुसे यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून मुलीच्या नातेवाईकांशी बोलणे करून दिले आणि न्याय मिळवून देण्याची हमी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी सात दिवसात या गुन्ह्याचा छडा लावण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन थांबले होते.

Nashik News | नाशिकमध्ये नदीपात्रात लाखो मृत माशांचा खच; महानगरपालिकेच्या कारभारावर नागरिकांचा संताप


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here