PM Narendra Modi | संविधानावर डोकं टेकवलं; ‘या’मुळे मोदींच्या शपथविधीची तारीख बदलली

0
40
PM Narendra Modi
PM Narendra Modi

PM Narendra Modi |  2014 च्या लोकसभा निवडणूक निकालानंतर NDA ने बहुमत मिळवले असून, आज भाजपप्राणित NDA ने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. तर, मोदी यांना NDA चे नेते म्हणून जाहिर केले आहे. दरम्यान, आता मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. मात्र, या शुभमुहूर्त नसल्याने मोदींच्या शपथविधीच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. तर, यानुसार आता नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे ८ जून नाहीतर ९ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. आधी ८ जून रोजी हा शपथविधी होणार असल्याची माहीत समोर आली होती. मात्र, शुभमुहूर्त नसल्याने आता मोदींचा शपथविधी हा ९ जून रोजी होणार आहे.

आजच्या या संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पार पडलेल्या एनडीएच्या बैठकीत देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड करण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावास गृहमंत्री अमित शाह (amit shah), नितीन गडकरी (nitin gadkari), चंद्राबाबू नायडू, कुमारस्वामी, नितीश कुमार यांनी अनुमोदन केले. तसेच यावेळी नितीश कुमार (nitish kumar) यांनी आमचं मोदींना पूर्ण समर्थन असून, तुम्ही लवकरात लवकर पंतप्रधान पदाची शपथ घ्या. आम्ही पुढील सर्व दिवस हे तुमच्या सोबतच आहोत. तर, यावेळी जरी या निवडणुकीचा निकाल काही इकडे तिकडे झाला असला, तरी पुढच्यावेळी विरोधी सर्व हरणार, असा विश्वासही यावेळी नितीश कुमार यांनी व्यक्त केला.

दरम्यान, भाजपच्या प्राणित एनडीएच्या या बैठकीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis), उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) हे देखील उपस्थित होते. मात्र, नाराज आळसयाची चर्चा असलेल्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना एनडीएच्या मंचावर मनाचे स्थान देण्यात आले. तर, अजित पवार यांना थेट अमित शाह यांच्या उजव्या हाताला स्थान मिळाले.

PM Narendra Modi | मोदींनी दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा; ‘या’ तारखेला होणार शपथविधी..?

PM Narendra Modi | सर्वप्रथम संविधानावर डोकं टेकवलं 

तर, मोदींनी सर्वप्रथम सेंट्रल हॉलमध्ये प्रवेश करताच संविधानाच्या प्रतिवर डोकं टेकवत संविधानाच्या प्रतीला वंदन केलं आणि यानंतर जे. पी. नड्डा यांनी पुष्पगुच्छ देत मोदींचे स्वागत केले. या लोकसभा निवडणुकीत भाजपचा २४० आणि NDA ला २९३ जागा मिळाल्या असून, सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा हा २७२ इतका आहे. त्यामुळे आज भाजपने बहुमताचा आणि सत्ता स्थापन करण्याचा दावा केला आहे.

‘स्वागत है भाई स्वागत है’

दरम्यान, आज दुपारी बारा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या सभेसाठी सेंट्रल हॉलमध्ये आले असता भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी त्यांचं स्वागत केले. तर, मोदी येताच सेंट्रल हॉलमध्ये टाळ्यांचा मोठा कडकडाट झाला आणि ‘स्वागत है भाई स्वागत है’ अशा घोषणाही यावेळी उपस्थितांनी दिल्या.

Devendra Fadnavis | पराभवाने फडणवीस खचले, उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार..?


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here