Deola | देवळा पोमोग्रेनेट ॲग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या वतीने जगातिक पर्यावरण दिन साजरा

0
18
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा पोमोग्रेनेट ॲग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आणि टेक्नोसर्व्ह टीमच्या वतीने गुंजाळ नगर येथे पर्यावरण दिन आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी देवळा कंपनीचे संचालक दीपक देवरे, रामचंद्र आहेर, शितल गुंजाळ, रवींद्र जाधव, योगेश गुंजाळ, जगदीश शिंदे आदींसह टेक्नोसर्व्हचे विकास गुमरे, अखिलेश कुमार, हर्षदा सरगर हे उपस्थित होते.

5 जून हा जगातिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपनाने झाली. कंपनीच्या महिला संचालिका आणि इतर महिला सभासदांनी वृक्षारोपण केले. टेक्नोसर्व्हच्या विकास गुमरे आणि अखिलेश कुमार यांनी शेतकर्‍यांना पर्यावरणाच्या गुणवत्तेच्या सुधारणा, कृषीत पुनरुत्थान कसे करावे, पर्यावरणीय विषयांची संचितता, पर्यावरण संरक्षण याविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरण विषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, तसेच शेतकरी बांधवांना वेगवेगळ्या झाडांचे महत्त्व पटवून दिले.

Deola | देवळ्यात भगरे समर्थकांनी उधळला गुलाल

रामचंद्र अहेर, जगदीश शिंदे यांनी मानव हा पर्यावरणाचा एक कुशाग्र घटक आहे. त्यामुळेच पर्यावरण दिन हा साजरा करणे ही काळाची गरज झाली असून, पर्यावरणाचा आपण कसं संवर्धन करू शकतो या बाबत आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन मयूर ठाकरे व अविनाश निकम यांनी केले याप्रसंगी उपस्थित सभासदांना रोपे वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here