BJP Goverment | ४०० पार सोडा, आता सत्तास्थापनेसाठीही दुसऱ्यांचे पाय धरावे लागणार..?

0
46
BJP Goverment
BJP Goverment

BJP Goverment | भाजपने या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी भाजपने यंदा ४०० पारचा नारा दिला होता. मात्र, भाजप अजून या नाऱ्याच्या आजूबाजुही पोहोचले नसल्याचे दिसत नसून, महाराष्ट्रात तर भाजपची चांगलीच दमछाक झाल्याचे दिसत आहे. इतर राज्यातही गेल्या निवणुकीच्या तुलनेत भाजपला कमी जागा मिळाल्याने आता भाजपचे स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न भंगले आहे. भाजपचा हा ४०० पार चा गोल सपशेल फेल ठरल्याचे दिसत असून, भाजपला आता दिल्लीत सत्ता स्थापन करण्यासाठी आणि नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी मित्रपक्षांचे पाय धरावे लागणार आहे. (BJP Goverment)

BJP Goverment | महाराष्ट्रात महाविकास आघाडीची दमदार कामगिरी

दरम्यान, महाराष्ट्रात महाविकास आघाडीने दमदार कामगिरी केली असून, इतर राज्यातही इंडिया आघाडीने चांगली कामगिरी केली आहे. तर एनडीए आणि इंडिया आघाडीच्या जागांमध्ये फारकाही तफावत नसल्याने आता इंडिया आघाडीलाही आपण केंद्रात सत्ता स्थापन करू शकतो. याबाबतचा आत्मविश्वास निर्माण झाल्याचे दिसत आहे.(BJP Goverment)

Jalgaon Lok Sabha Result | खान्देशमधून पहिला निकाल हाती; भाजपचे कमळ फुलले

इंडिया आघाडी शरद पवार यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी

इंडिया आघाडीने शरद पवार यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी टाकली असून, त्यांनी नितीष कुमार यांच्यासोबत शरद पवार चर्चा करत असल्याची माहीती समोर आली आहे. त्यामुळे देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा शरद पवारांचा बुलंद आवाज घुमनर असल्याचे दिसत आहे. तर, भाजपनेही आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू यांच्याशी संपर्क केल्याची माहिती समोर आली आहे. सरकार स्थापनेच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी इंडिया आघाडीची उद्या नवी दिल्लीत बैठक होणार असून,  या बैठकीला शरद पवार (sharad pawar) आणि उद्धव ठाकरे (uddhav thackeray) हेदेखील उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. (BJP Goverment)

Piyush Goyal | राज्यातील पहिला निकाल; ‘या’ जागेवर भाजपचे कमळ फुलले


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here