Deola | मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर देवळ्यातील चार नेते नजरकैदेत

0
12
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे बुधवार (दि. १५) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा झाली. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना पोलिसांनी नजरकैदेत ठेवले होते. यात देवळा तालुक्यातील चार युवकांनाही देवळा पोलीस ठाण्यात नजर कैद करण्यात आली होती. यानंतर आता त्यांची सुटका करण्यात आली आहे.

मोदी सरकारवर कांदा उत्पादक शेतकरी वर्गाची विशेष नाराजी असून, देवळा तालुका हा कांदा बेल्ट म्हणून प्रसिद्ध आहे. यातच मागील काही दिवसांपासून शेतकरी संघटना व महाविकास आघाडीतील नेते मोदी सरकारवर सडकून टीका करत आहेत. त्यातच महाविकास आघाडीचे स्टार प्रचारक तथा किसान युवा संघटनेचे अध्यक्ष यशवंत गोसावी यांनी शेतकरी मोदींची सभा होऊ देणार नाहीत, असा इशारा दिला होता.

Nashik News | व्हाट्सअ‍ॅप ग्रुपच्या ॲडमिन्सलाही नोटिस; १५ शेतकरी आंदोलक ताब्यात

यामुळे हे नेते मोदींच्या दौऱ्या दरम्यान निदर्शने करू शकतात. ही शक्यता लक्षात घेत तालुक्यातील अनेक नेत्यांची (दि.१५) रोजी उचलबांगडी करत पोलीस ठाण्यात नजर कैद करण्यात आले होते. मोदींच्या सभेत कुठलाही व्यत्यय नको, यासाठी देवळा पोलीस गेल्या काही दिवसांपासून कामाला लागले आहेत. मागील काही दिवसांपासून तालुक्यातील अनेक नेत्यांना, संघटनांच्या पदाधिकारी यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.

Deola | यांना केले स्थानबद्ध

देवळा तालुक्यातील महाविकास आघाडीचे स्टार प्रचारक तथा किसान युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत गोसावी, शरद पवार गटाचे चांदवड – देवळा विधानसभा अध्यक्ष विजय पगार, प्रहार संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष कृष्णा जाधव, प्रहार देवळा उपाध्यक्ष हरिसिंग ठोके, इत्यादी नेते पदाधिकाऱ्यांना सकाळी पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नजर कैद करून सायंकाळी सोडण्यात आले.

Nashik Loksabha | दिग्गजांच्या तोफा नाशकात धडाडणार; याचा उमेदवारांना फायदा होणार..?


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here