सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना देवळा तालुक्यातील (वायबीएस) एकलव्य भिल्ल सेनेने पाठिंबा दिला असून, त्यांना तालुक्यातुन भरघोस मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष रघु नवरे यांनी दिली.
नवरे यांनी यावेळी सांगितले की, दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या विद्यमान खासदार व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना मागील काळात आमच्या एकलव्य भिल्ल सेनेनेच्या वतीने संपूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीमागे उभे राहून तालुक्यातुन भरभरून मताधिक्य मिळवून दिले होते.
Deola | देवळ्याचे व्याही चंद्रशेखर बावनकुळे यांची देवळा भेट
मात्र, गेल्या पाच वर्षांपासून डॉ पवार यांनी आमच्या देवळा तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांकडे साफ दुर्लक्ष केले. खेड्यात राहणारे आदिवासी बांधव आजही शिक्षण, वीज, पाणी, रेशन, आरोग्य सुविधा, घरकुल योजना आदी शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहेत. त्यामुळे पवार यांच्यावर आदिवासी समाजाणे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
देवळा तालुक्यातील सर्व आदिवासी समाज आता महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असून, त्यांना तालुक्यातुन एकलव्य भिल्ल सेनेने जाहीर पाठींबा देत भरघोस मताधिक्य मिळवून देण्यासाठी गाव वाडी वस्ती वर जाऊन भगरे यांचा प्रचार सुरू केला असून, समाजाकडून त्यांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देखील मिळत असल्याची माहिती शेवटी वायबीएस ग्रुप एकलव्य भिल्ल सेनेचे देवळा येथील संस्थापक अध्यक्ष रघु नवरे यांनी दिली.
Deola | भास्कर भगरे यांचा देवळा दौरा; मतदारांना पाठीशी उभे राहण्याचे आवाहन
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम