Dindori Lok Sabha | अखेर जे पी गावितांची माघार; भगरेंना देणार पाठिंबा

0
29
Dindori Lok Sabha
Dindori Lok Sabha

Dindori Lok Sabha |  नाशिकनंतर आता दिंडोरी लोकसभा मतदारसंघातही नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहे. दिंडोरीच्या जागेसाठी माकपचे माजी आमदार जे पी गावीत हे आग्रही होते. मात्र ही जागा शरद पवार गटाच्या वाट्याला आली. त्यामुळे नाराज असलेल्या जे.पी गावीत यांनी माकपकडून स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यापूर्वीही त्यांची अनेकदा मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला.(Dindori Lok Sabha)

मात्र, ते निवडणूक लढवण्यावर ठाम होते. दरम्यान, काल त्यांनी माघार घेणार असल्याचे जाहीर केले होते आणि आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. गावीत यांच्या माघारीनंतर आता दिंडोरीत भाजपच्या डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar), राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे, वंचितच्या मालती थविल आणि भाजपचे नाराज माजी खासदार अपक्ष उमेदवार हरिश्चंद्र चव्हाण यांच्यात लढत रंगणार आहे.

Dindori Lok Sabha | आता राष्ट्रवादीने माघार घ्यावी; गावितांनी भरला उमेदवारी अर्ज

भास्कर भगरे यांना पाठिंबा देणार

गेले काही दिवसांपूर्वी गावीत यांनी जाहीर सभा घेत शरद पवारांना आणि महाविकास आघाडीला इशारा दिला होता. दिंडोरीची जागा द्यावी, अन्यथा शरद पवार गटाच्या उमेदवाराला आम्ही पडणारच असा इशाराच गावीत यांनी दिला होता. यानंतर मोठे शक्तिप्रदर्शन करत त्यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला होता. मात्र, त्यांची समजूत काढण्यात शरद पवार गटाला यश आले असून, त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून, गावित आता शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांना पाठिंबा देणार आहेत. (Dindori Lok Sabha)

Dindori Lok Sabha | जयंत पाटलांना अपयश; गावित आज उमेदवारी अर्ज दाखल करणार 

Dindori Lok Sabha | काय म्हणले जे पी गावीत..? 

यावेळी मध्यमांशी बोलताना “गावीत म्हणाले की,”माकपतर्फे मी लोकसभा निवडणुकी लढवण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र दिंडोरीची जागा ही महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला देण्यात आल्याने महाविकास आघाडीचा एकच उमेदवार पाहिजे, अशी विनंती राष्ट्रवादीकडून करण्यात आली होती.

तसेच माकप पक्षानेही आम्हाला सुचना केल्यामुळे मी आता दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माझी उमेदवारी मागे घेत आहे. खरंतर माझ्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाला याचा फायदाच झाला असता. मात्र, आता भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत दिंडोरीत होणार आहे. त्यामुळे आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार भास्कर भगरे यांना जाहीर पाठींबा देत असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. (Dindori Lok Sabha)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here