सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी आदर्श आचारसंहिता सुरू झाली आहे. स्वीप उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य नोडल अधिकारी – स्वीप आशिमा मित्तल यांनी ग्रामीण भागासाठी तालुकानिहाय नोडल अधिकारी – स्वीप म्हणून जिल्हा व तालुका अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
त्यानुसार १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त देवळा शहरातून तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, मुख्याधिकरी प्रमोद ढोरजकर, गटविकास अधिकारी भरत वेंदे, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सपोनि दिपक पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी यांनी देवळा तहसील कार्यालयापासून शिवस्मारकपर्यंत मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी मतदान जनजागृतीबाबत घोषणा देण्यात आल्या. तसेच नगरपंचायत कार्यालयाजवळ मतदान करण्यासाठी सामूहिक शपथ घेऊन स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. तालुक्यात ग्रामीण भागासाठी गटविकास अधिकारी भरत वेंदे यांची स्वीप नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे.
Deola | भास्कर भगरे यांचा देवळा दौरा; मतदारांना पाठीशी उभे राहण्याचे आवाहन
याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी सतिश बच्छाव, राजेंद्र चव्हाण, शामकांत पाटील, नानासाहेब पवार, डॉ. संतोष पजई, राजेश विसावे, सुनील देवरे आदी विभाग प्रमुखांसह सर्व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी देवळा शहरातून मतदार जनजागृती फेरी काढण्यात आली. मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे. मतदान करावे जास्तीत जास्त मतदान होऊन मतदानाची टक्केवारी वाढावी हा यातील प्रमुख उद्देश आहे.
त्यानुसार देवळा शहरातील बसस्थानक परिसरातून जनजागृती फेरी काढण्यात आली. यावेळी कर्मचाऱ्यांनी मतदार जनजागृतीच्या घोषणा देत “मतदार राजा जागा हो- लोकशाहीचा धागा हो, वोट द्यायला जायचे आहे – आपले कर्तव्य बजवायचे आहे, मत द्या आपला आवाज ऐकू द्या, तसेच हातात जनजागृतीचे फलक घेऊन शहरातून जनजागृती करण्यात आली. यावेळी पंचायत समितीचे तुषार थोरात ,राजेंद्र जगताप, समीर बच्छाव, ललित जाधव, रविंद्र पवार, योगेश पगार, संभाजी देवरे, रुपेश आहेर, अनिल आहेर यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.
Deola | देवळ्यात उमेदवारांपेक्षा तालुक्यातील तीन युवा नेतृत्वांचीच चर्चा
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम