Deola | भास्कर भगरे यांचा देवळा दौरा; मतदारांना पाठीशी उभे राहण्याचे आवाहन

0
32
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  महाविकास आघाडीचे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार भास्कर भगरे यांनी बुधवार (दि. १) रोजी देवळा तालुक्यातील गावांना भेटी देऊन आपला प्रचार दौरा केला. यावेळी मतदारांनी त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार केला. खालप व अन्य ठिकाणी भगरे यांना आर्थिक मदतदेखील करण्यात आली. यावेळी विठेवाडी, सावकी, खामखेडा, भऊर, वरवंडी मटाने, लोहोणेर, खालप, वासोळ, वासोळपाडा, देवपूरपाडे, महालपाटणे, निंबोळा, डोंगरगाव, मेशी व खडकतळे येथील मतदारांच्या गाठीभेटी घेऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत त्या पूर्णत्वास नेण्याकरिता आपणांस निवडून देण्याचे आवाहन भगरे यांनी केले.

विठेवाडी गावांत येथील ग्रामस्थ व विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थेचे चेअरमन बाळासाहेब सोनवणे, दिनकर जाधव, दिपक निकम, पंडितराव निकम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव, संचालक महेंद्र आहेर, शेतकरी संघटनेचे नेते फुला जाधव, धनाजी निकम, संजय सावळे, माणिक निकम, प्रविण निकम, प्रभाकर निकम, सुभाष कापडणीस ,कैलास कोकरे, जिभाऊ फुला बोरसे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Nashik Loksabha | नाशिकच्या उमेदवारीसाठी केदा आहेरांचा विचार न झाल्याने कार्यकर्ते नाराज..!

Deola | ज्यांनी केली निर्यात बंदी केली त्यांना आमची मतदान बंदी

यावेळी विठेवाडी झिरेपिंपळ विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या वतीने उमेदवार भास्कर भगरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे डॉ, सयाजीराव गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार भास्करराव भगरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.

ज्यांनी कांद्याची निर्यात बंदी केली त्यांना आमची मतदान बंदी आहे. केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा जाहीर निषेध करण्यात आला. खालप येथे वसाकाचे माजी संचालक आनंदा देवरे, उपसरपंच बाजीराव सूर्यवंशी, डी.के अहिरे, जिभाऊ सूर्यवंशी, अविनाश सूर्यवंशी, कैलास देवरे, सचिन सूर्यवंशी, पोपट सूर्यवंशी, साहेबराव सूर्यवंशी, संभाजी सूर्यवंशी, भगवान अहिरे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Rajabhau Waje | गोडसेंवर नाराज नेत्यांचा वाजेंना पाठिंबा..?; वाजेंचे सूचक वक्तव्य..?


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here