Sunetra Pawar | सध्या राज्यासह देशात लोकसभा निवडणुकांची धूम सुरू असून, उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षातील बड्या नेत्यांनीही कंबर कसली आहे. अनेक ठिकाणच्या निवडणुकांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. यात सर्वात महत्त्वाची जागा म्हणजे बारामती लोकसभा मतदार संघ. येथे ननंद म्हणजेच महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या सुनेत्रा अजित पवार यांच्यात लढत आहे. यासाठी दोन्ही पक्षांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले असून, दोन्ही उमेदवारांची आणि काका पुतण्यांची प्रतिष्ठा येथे पणाला लागली आहे. (Sunetra Pawar)
यासाठी प्रचार सभा, रोड शो इत्यादि जय्यत तयारी सुरु आहे. लेकीसाठी बापाने तर, पत्नीसाठी अजित पवारांनी बारामती लोकसभा मतदार संघ पिंजून काढला आहे. दरम्यान, सुनेत्रा पवारांच्या प्रचारात बोलताना अजित पवार यांनी पत्नीला निवडणून देण्याचे आवाहन केले असून, त्यांना विजयी केल्यानंतर त्यांनी मला त्यांनी सांगितलेले प्रत्येक काम मला तुमच्यासाठी करावे लागणार आहे. नाहीतर माझे काही खरं नाही, असे मिश्कील वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.(Sunetra Pawar)
Ajit Pawar | ईव्हीएमची बटणं कचाकचा दाबा, नाहीतर..; दादांची जीभ घसरली..?
तुम्ही निवडून दिलेल्या खासदारांचे काही चालत नाही
मंगळवारी रात्रीच्या सुमारास अजित पवार खडकवासला विधानसभा मतदारसंघात भेटीगाठी घेत होते. यावेळी त्याआणि सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी येथील नागरिकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या असता. ते म्हणाले की, “खडकवासला या गावाची ८० टक्के जागा ही एनडीएसाठी घेतली असून, त्याबाबत तोडगा काढायचा आहे. जेव्हा या मतदार संघातील खासदार संरक्षण मंत्र्यांना भेटतील.(Sunetra Pawar)
तेव्हा हा तोडगा निघेल. त्यामुळे आता तुम्ही घड्याळाला मत द्या. म्हणजे आपोआप तुमचा खासदार हा प्रश्न मार्गी लावणार आहे. मागील निवडणुकीत तुम्ही निवडून दिलेल्या विरोधी पक्षाच्या खासदारांचे या ठिकाणी काही चालत नसल्याचा टोलाही यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला.
Ajit Pawar | शरद पवारांची राजकीय गुगली; अजित दादा एकटे पडले
Sunetra Pawar | जर तुम्ही माझ्या बायकोला निवडून दिले तर..
सुनेत्रा पवार जर खासदार झाल्या तर याचा तुम्हाला फायदाच आहे. कारण त्यांच्या माध्यमातून तुम्हाला माझाही फायदा होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही माझ्या बायकोला निवडून दिले तर, मीच तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए, जिल्हा परिषद, या सगळ्या ठिकाणी राज्य सरकारचाच निधी असणार आहे. ती सर्व जबाबदारी माझी आहे. कारण उद्या बायकोने घरी म्हटलं की, हे काम करुन द्या, तर मला ते काम करुन द्यावंच लागेल. नाहीतर माझं काही खरं नाही. असे मिश्कील वक्तव्य अजित पवार यांनी केले. (Sunetra Pawar)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम