Gold Silver Rate 24 April 2024 | गेल्या दोन महिन्यांपासून सोने आणि चांदीचे दर हे गगनाला भिडलेले आहेत. या किंमतींमध्ये लगतार वाढ होताना आहे. इराण आणि इस्त्राईलमध्ये वाढत्या तणावामुळे मौल्यवान धातूंच्या किंमती झपाट्याने वाढल्या. मार्च आणि एप्रिलमध्ये तर सोन्याच्या किंमतींनी ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळवले. ऐन लग्नसराईत सोने आणि चांदीने वधू पित्यांची चिंता वाढवली असून, सध्या सोने हे सर्वसमान्यांच्या अवाक्याबाहेर गेले आहे. मार्च महिन्यापासूनच या धातूने दरवाढीकडे कूच केली असून, आता एप्रिलमध्ये यापूर्वीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.(Gold Silver Rate 24 April 2024)
या एप्रिल महिन्यात इराण आणि इस्त्राईलच्या वादामुळे सोने आणि चांदीच्या किंमती झरझर वाढल्या आणि गेल्या वर्षीप्रमाणे किंमतींनी पुन्हा आधीचे सर्व रेकॉर्ड मोडले. भारतात स्थानिक बाजारात सोने हे 76,000 रुपये झाले आहे. इराण आणि इस्त्राईल संघर्षासोबतच चीनमधील ग्राहकांनी सोने चांदीच्या खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याने जागतिक बाजारातच या धातूंच्या किंमती वाढल्या आहेत. तर, जाणून घेऊयात काय आहेत आजचे सोने आणि चांदीचे दर…
Gold Silver Rate Today | चांदी खरेदीसाठी योग्य वेळ; असे आहेत सोने-चांदीचे दर
सोन्याचे दर घसरले
मार्च महिन्यापासून सुरू असलेल्या सोन्याच्या दरवाढीने आता एप्रिलमध्ये मोठी झेप घेतली आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमती या 2,000 रुपयांनी वाढल्या. तर 430 रुपयांनी भावात घसरण झाली. दरम्यान, आता या आठवड्यात सोन्याने ग्राहकांना दिलासा दिला असून, सोमवारी सोन्याच्या किंमती 550 रुपयांनी खाली आल्या. तर, मंगळवारी पुन्हा सोन्याच्या किंमतीत 1530 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, आज 22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याचे दर हे 66,300 रुपये तर 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याचे दर हे 72,310 रुपये असे आहे.(Gold Silver Rate 24 April 2024)
Gold Silver Rate 24 April 2024 | चांदीतही घसरण
मागील आठवड्यापासून चांदीनेही ग्राहकांना दिलासा दिला असून, 17 एप्रिल रोजी चांदीत 500 रुपयांची घसरण झाली. मात्र, 18, 19 आणि 20 एप्रिल रोजी चांदीच्या किंमतीत बदल झाले नाही. या आठवड्यातही चांदीच्या भावात नरमाई आहे. सोमवारी चांदीत 1 हजारांची घसरण झाली. तर मंगळवारी चांदी 2500 रुपयांनी पुन्हा खाली आली. दरम्यान, गुडरिटर्न्सनुसार, आज एक किलो चांदीचा भाव हा 83,000 रुपये इतका आहे.(Gold Silver Rate 24 April 2024)
Gold Silver Rate Today | सोने-चांदी खरेदीची हिच योग्य वेळ; असे आहेत दर
असा आहे 14 ते 24 कॅरेटचा भाव
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, सोने आणि चांदीत घसरण झाली.
24 कॅरेट (प्रति 10 ग्रॅम) – 71,598 रुपये,
23 कॅरेट (प्रति 10 ग्रॅम) – 71,311 रुपये,
22 कॅरेट (प्रति 10 ग्रॅम) – 65,584 रुपये,
18 कॅरेट (प्रति 10 ग्रॅम) – 53,699 रुपये,
14 कॅरेट (प्रति 10 ग्रॅम) – 41,885 रुपये असा आहे.
तर, एक किलो चांदीचा भाव हा 80,007 रुपये असा आहे. (Gold Silver Rate 24 April 2024)
(टीप – वरील दर हे सूचक असून, त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरसोबत संपर्क साधावा.)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम