Satana | सटाणा तालुक्यातील जापखेडा या गावातील ग्रामपंचायत सदस्या मीरा सीताराम सोनवणे (वय २५) हिचा मृतदेह कातरवेल शिवारातील वाकड्या पुलाखाली आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली. या महिलेची हत्या ही प्रेमसंबंधांतून झाल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासातून पुढे आली आहे. तर, ही मृत महिला दोन महिन्यांपासून बेपत्ता होती.(Satana)
Satana | नेमकं प्रकरण काय..?
अधिक माहितीनुसार, मृत महिलेचे गावातील अजय बोरसे या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. या दोघांच्या संबंधांना बोरसे यांच्या पत्नी आणि मृत महिलेच्या आई-वडीलांचा विरोध असल्याने त्यांच्यात नेहमीच वाद होत. दरम्यान, या वादाला कंटाळून संशयित आरोपी अजय बोरसे याने दोरीने गळा आवळून मृत मीरा सोनवणे हीचा खून केला आणि तिचा मृतदेह कातरवेल शिवारात वाकड्या पुलाखाली टाकून दिला कातरवेल येथील आदिवासी युवक लाकडं गोळा करण्यासाठी जंगलात गेला असता, त्याला तिथे या महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.(Satana)
Satana News | सटाणा नगरपालिका ही राज्यात अव्वल!
त्याने तातडीने कातरवेल येथील पोलीस पाटलांना यासंदर्भात माहिती दिली. यानंतर पोलीस पाटलांनी जायखेडा पोलिसांना या संपूर्ण घटनेबाबत सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि मृतदेहाच्या अंगावरील कपडे, पायातील बूट व अन्य साहित्याच्या आधारे मृतदेह मीरा सोनवणे हिचा असल्याची ओळख पटवली. पोलिसांनी संशयित आरोपी अजय बोरसे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला तातडीने अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.(Satana)
Satana | आमदार दिलीप बोरसे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम