सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा शहरात रविवारी (दि. २१) रोजी मोठ्या प्रमाणावर वाहतूकीची कोंडी निर्माण झाली. ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी सायंकाळी उशिरापर्यंत देवळा पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली. काही बेशिस्त वाहनचालकांमुळे झालेल्या वाहतूक कोंडी मुळे इतर वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. निवडणूक व गडावरील यात्रा बंदोबस्तासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांमुळे अवघ्या चार पोलिसांवर वाहतूक सेवा सुरळीत करण्याची जबाबदारी आल्याने त्यांची पुरती धावपळ उडाली.(Deola)
रविवारी देवळ्याचा आठवडे बाजार, दाट लग्न तिथी त्यात गडावरील यात्रा यामुळे तिन्ही रस्त्यांवर दुपारी
साधारण तीन वाजेपासून देवळा-कळवण रोड, देवळा-सटाणा रोड, देवळा-नाशिक रोड, देवळा-मालेगाव रोड वर वाहतूकीची कोंडी झाली. यामुळे ह्या सर्व रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने ही वाहतूक सेवा सुरळीत करण्यासाठी अपुऱ्या पोलीस बळाअभावी वाहन धारकांनी व नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. यात काही बेशिस्त वाहनधारकांमुळे इतर वाहनधारकांना तासन तास ताटकळत राहावे लागल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.(Deola)
Deola | भव्य कुस्ती दंगलीने खर्डे येथे यात्रेचा समारोप
सप्तशृंगी गडावर यात्रा सुरू झाल्याने वाहतूक सेवा वाढली असून, त्यात रविवारी देवळा येथे आठवडे बाजार होता. तसेच लग्न तिथी असल्याने यात मोठ्या प्रमाणावर भर पडल्याने दुपारी तीन वाजेपासून ह्या चारही मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली. ही वाहतूक सेवा सुरळीत करण्यासाठी अपुऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांमुळे मोठी अडचण निर्माण झाली.
निवडणुकीसाठी येथील पोलीस इतरत्र बंदोबस्तासाठी गेल्याने अवघ्या चार पोलिसांची वाहतूक सेवा सुरळीत करण्यासाठी पुरती दमछाक पहावयास मिळाली.(Deola)
सायंकाळी उशिरा पर्यंत वाहतूक कोंडीची समस्या जैसे थे असल्याने वाहतूक दारांना तसेच पादचाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने योग्य पाऊले उचलणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी देवळा पोलीस ठाण्यात जादा कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.(Deola)
Deola | देवळा मेडिकल असोसिएशनच्या वतीने भाविकांसाठी मोफत औषधांचे वाटप
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम