Maratha Reservation | आजचा दिवस हा मराठा समाजासाठी निर्णायक दिवस आहे. आज राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले आहे. दरम्यान, याबाबत एक मोठी माहिती समोर आली असून, यानुसार मराठा समाजाला किती टक्के आरक्षण द्यायचा याचा निर्णय झाल्याचे सांगितले जात आहे. अधिवेशनाआधी मंत्री मंडळाची बैठक पार पडली. यात याबाबतचा निर्णय झाला असून, मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाली आहे. या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले असून, हाच निकाल अधिवेशनातही होण्याची शक्यता आहे. (Maratha Reservation)
तर, टीव्ही 9 च्या वृत्तानुसार, मराठा समाजाला शिक्षणात आणि नोकरीत १० टक्के आरक्षण मिळणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाचा जो सर्वे केला. त्यानुसार राज्य मागासवर्ग आयोगाने अहवाल तयार केला असून, या अहवालात मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा उल्लेख केलेला आहे.
अहवालातील महत्वाच्या बाबी पुढीलप्रमाणे..
मराठा समाजाचा सर्वे करून मराठा आरक्षणाबाबत राज्य मागासवर्ग आयोगातर्फे तयार करण्यात आलेल्या मसुद्यात काही महत्त्वाच्या बाबी नमूद करण्यात आलेल्या आहेत. त्या बाबी पुढीलप्रमाणे..(Maratha Reservation)
- मराठा समाजाला शिक्षणात आणि नोकरीत १० टक्के आरक्षण मिळणार आहे.
- मराठा समाज सामाजिक तसेच शैक्षणिकदृष्या मागास असल्याचाही उल्लेख यात आहे.
- सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळणार आहे.
- राज्यातील शिक्षण संस्थांच्या प्रवेशासाठीदेखील आरक्षण दिले जाणार आहे.
- तब्बल ८० टक्के मराठा समाज आरक्षणासाठी पात्र आहे.
- राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी एकट्या मराठा समाजाची लोकसंख्या ही तब्बल २८ टक्के इतकी आहे.
Maratha Reservation | हे मंत्री उपस्थित
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आज विशेष अधिवेशन बोलावण्यात आले असून, या विशेष अधिवेशनाआधी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही कॅबिनेट बैठक बोलावली असून, या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. तसेच यांसह मंत्री चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई, तानाजी सावंत, सुरेश खाडे, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, संदिपान भुमरे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, छगन भुजबळ, दादा भुसे हे महत्त्वाचे मंत्री या बैठकीसाठी उपस्थित होते. यावेळी राज्य मागासवर्ग आयोगाने तयार केलेला अहवाल हा मंत्रीमंडळासमोर सादर करण्यात आला. तसेच या बैठकीत मराठा समाजाला कसं आरक्षण देता येईल?, यावर चर्चा झाली.(Maratha Reservation)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम