Chhagan Bhujbal | विणकरांसाठी मंत्री छगन भुजबळ मैदानात; केली ही मागणी

0
31
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal |  येवला येथील पैठणी उद्योगाला चालना देण्यासाठी या ठिकाणी तुतीच्या शेतीला प्रोत्साहन देवून रेशीम उत्पादनासाठी रेशीम पार्क उभारण्याची गरज आहे. यासाठी आपले प्रयत्न असून एरंडगाव खुर्द येथे २५ एकर जागा रेशीम पार्क करिता देण्यात आली आहे. त्यादृष्टीने सबंधित अधिकाऱ्यांनी सविस्तर प्रकल्प अहवाल लवकरात लवकर शासनास सादर करावा अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. येवला येथील महात्मा फुले नाट्यगृहात आज वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील व मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘एकात्मिक व शास्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३ – २०२८’ अंतर्गत हातमाग विणकरांना उत्सव भत्ता धनादेश वाटप सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते.(Chhagan Bhujbal)

Chhagan Bhujbal | पारंपारिक विणकरांना ओळखपत्र देण्यात यावे

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, “पारंपारिक विणकरांचे सर्वेक्षण करून त्यांना केंद्र शासन आणि राज्य शासनाकडे नोंदणी करून ओळखपत्र देण्यात यावे. उत्सव योजनेचा लाभ देताना केंद्र शासनाकडे नोंदणी असणे बंधनकारक आहे. ही अट शिथिल करून राज्य शासनाकडे नोंदणी असलेल्या सर्वच विणकरांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी मंत्री चंद्रकांत दादांनी सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली.”

Deola | विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी खरे योगदान आई वडिलांचे – मुख्याध्यापक धिवरे

पुढे ते म्हणाले की, देशात शेती खालोखाल जर कुठला प्रमुख व्यवसायात असेल तर त्यात विणकर वस्त्रोद्योगाचा समावेश आहे. प्रामुख्याने येवल्यात मोठ्या प्रमाणात विणकर आहेत. मी सन २००४ साली येवल्यात आलो तेव्हा येवल्यात पैठणीची फक्त तीन दुकाने होती. आता सुमारे ४०० हून अधिक दुकाने सुरु आहे. यातून पैठणी विणकरांना मोठा रोजगार उपलब्ध झाला असल्याचे त्यांनी सांगितले.(Chhagan Bhujbal)

ते म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी विणकरांच्या कलेची दखल घेऊन ७ ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय हॅन्डलूम डे’ म्हणुन घोषित केलेला आहे. केंद्र आणि राज्यसरकार कडून राज्यातील प्रत्येक लहान लहान घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांना न्याय मिळावा यासाठी आपण राज्यात अनेक समाजासाठी महामंडळे स्थापन केली. विणकर समाजासाठी देखील महामंडळ स्थापन करण्याची तयारी तयारी सुरु आहे. वस्रोद्योग हा येवल्यात मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे या व्यवसायाशी आपला जवळचा संबंध असून विणकरांच्या प्रश्नांची आपल्याला जाण आहे. कालच येवल्यात ‘शासकीय रेशीम कोष खुली बाजारपेठ’ निर्मितीस वस्त्रोद्योग विभागाने मान्यता दिली आहे.

Bharat Ratna | …तर बाळासाहेब ठाकरेंनाही भारतरत्न जाहीर करावा

भांडगे यांना तीन वेळा राष्ट्रपती पुरस्कार

येवला शहरामध्ये पैठणी महावस्त्राचे विणकाम कला आजही टिकून आहे. येवला शहरात आजमितीस ३० गावांमध्ये साधारण ४ हजाराहून जास्त विणकर पैठणी साडी हाताने विणण्याचे कामकाज करीत आहे. अनेक कुटुबांनी स्वतःच्या हातमाग व्यवसायाला मोठ्या उंचीवर नेऊन महत्व प्राप्त केले आहे. त्यातील पैठणी उत्पादक भांडगे यांना तीन वेळा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे. तर श्री. रमेशसिंग रामसिंग परदेशी यांना प्रधानमत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘राष्ट्रपती पुरस्कार’ प्रदान करण्यात आलेला असल्याचे त्यांनी नमूद केले.(Chhagan Bhujbal)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here