Deola | मद्यधुंद एसटी बस चलकाच्या विरोधात देवळा पोलिसांत गुन्हा दाखल

0
65
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  देवळा-नाशिक मार्गावर मद्यसेवन करून मद्यधुंद अवस्थेत बस चालविणाऱ्या सटाणा-पुणे या बसच्या चालकाच्या विरोधात देवळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष वणीस असे या मद्यधुंद बसचालकाचे नाव आहे.

Deola | नेमकं प्रकरण काय..?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सटाणा येथून रविवार (दि. २८) रोजी सकाळी आठ वाजता निघालेली सटाणा आगाराची सटाणा – पुणे बस क्रमांक (एमएच १४ बी टी २२६६) ही सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान देवळा शहरापासून पुढे असलेल्या गोदावरी हॉटेलजवळून मार्गक्रमण करीत असताना राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने एकेरी वाहतूक असताना देखील चालकाचे बसवर अपेक्षित नियंत्रण नसल्याचे बसमधील प्रवाशांच्या लक्षात आले.(Deola)

Deola | देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनय देवरेंना ‘राष्ट्रपती पदक’ जाहीर

दरम्यान, प्रवाशांनी तक्रार केल्यावर आणि सर्व प्रवासी खाली उतरल्यावर एक ते दीड किमी बस मागे पुढे घेतली. या सगळ्या घटनेनंतर प्रवाशांनी देवळा पोलीस ठाणे व सटाणा आगाराशी संपर्क साधत ही आपबीती कथन केल्यावर सटाणा येथील आगार प्रमुखांनी पर्यायी बस पाठवून प्रवाशांची व्यवस्था पुढील प्रवासाची केली व संबंधित बस चालकाच्या विरोधात देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहतूक निरीक्षक सिताराम कांबळे यांनी या घटनेबाबत देवळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. एसटी महामंडळाकडून अशा प्रकारच्या घटना यापुढे घडू नये. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व सुखरूप होईल याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी यावेळी संबंधित बस मधील प्रवाशीवर्गाने केली.(Deola)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here