Deola | सामाजिक दायित्व पार पाडत, देवळ्यातील वधू वरांनी ठेवला आदर्श

0
50
Deola
Deola

सोमनाथ जगताप : प्रतिनिधी – देवळा |  देवळा येथे सामाजिक बांधिलकी जोपासत आपल्या विविह सोहळ्याप्रसंगी नव वधूवराकडून अनाथ व निराधार मुलांसाठी सामाजिक काम करणा-या ‘शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्ट’ला ११ हजार १११ रुपयांचा धनादेश देत आपला विवाह साेहळा पार पाडला. ह्या अनोख्या उपक्रमाबद्दल उपस्थित वऱ्हाडी मंडळींनी नवदाम्पत्याचे कौतुक केले. (Deola)
साधारणतः नवदाम्पत्य हे आपल्या लग्नानंतर वैवाहिक जीवनाचे सुख स्वप्नांत रंगुन जातात. मात्र काही नववर- नववधु हे आपल्या लग्नाच्या साेहळ्यात सामाजिक ऋणतेचं भान लक्षात ठेवुन सामाजिक दातृत्व दाखवत आपल्या विवाह साेहळ्याला अविस्मरणीय बनवतात.

असाच एक प्रसंग सोमवार (दि.  २५) रोजी देवळा येथे एका विवाह सोहळ्यात बघायला मिळाला. वर चि. अजय व चि.सौ.का. हर्षदा यांनी आपल्या विवाह साेहळ्यात महाराष्ट्रातील अनाथ व निराधार मुलांसाठी काम करणा-या शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टला ११ हजार ,१११ रुपयांचाचा धनादेश देत दिला. (Deola)

Deola | खामखेडा गावावर तिसऱ्या डोळ्याची नजर ; १६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच

वर अजय हे पेशाने डाॅक्टर असुन नववधु हर्षदा हीने देखील बी.एस्सी. डी.एम.एल.टी चे शिक्षण घेतलेले आहे. दाेघांनी आपल्या विवाह साेहळ्यात ज्यांना आईवडील नाहीत. अशा अनाथ आणि निराधार मुलांना आर्थिक मदतीचा हात पुढे केला. (Deola)

खरंतर, समाजात अनेक विवाह साेहळे हे वेगवेगळ्या पद्धतीने दणक्यात पार पडताना आपल्याला बघायला मिळतात. परंतु, आपण ह्या समाजाचे काही तरी देणं लागताे याचे भान व संवेदनशीलता जागृत ठेवुन या दाम्पत्याने अनाथांना केलेली आर्थिक मदत ही ह्या विवाह साेहळ्यासाठी उपस्थितांच्या मनात भारावून गेली. दरम्यान, या नव दाम्पत्याचे सर्वच स्तरावरून काैतुक हाेत आहे. (Deola)

Deola Agro | देवळा ऍग्रो कंपनीची उत्कृष्ट कंपनी पुरस्कारासाठी निवड

“मी अनेक वर्षापासून माझा भाऊ सत्यम आहेर यांच्यासमवेत समाजातील अनाथ व निराधार मुलांसाठी काम करणा-या शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टचे काम पाहत आली आहे. माझा ही यात खारीचा वाटा असावा, असे मला नेहमीच वाटायचे म्हणुन माझ्या विवाह साेहळ्यात आर्थिक मदत करून मी सामाजिक दायित्व पार पडले आहे.” नववधु – हर्षदा


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here