Political News | महाविकास आघडीचं ठरलं ?; बघा कोणाला कीती जागा

0
30
Political News
Political News

Political News |   राज्यात आगामी लोकसभा निवडणुकांचे बिगुल हे येत्या फेब्रुवारी महिन्यात वाजण्याची शक्यता आहे. दरम्यान, ह्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी चांगलीच कंबर कसल्याचे दिसत आहे. येत्या २९ किंवा ३० डिसेंबर रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी हे नागपूर दौऱ्यावर येणार आहेत.(Political News)

आणि या दौऱ्यानंतर राजधानी दिल्लीमध्ये ह्या लोकसभा जागावाटप ह्या विषयावर विशेष बैठक पार पडणार आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात ह्या दोन फॉर्म्युलांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. यातही महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथील जागा लढवण्यासाठी एका मोठ्या सत्ताधारी पक्षातील नेता हा काँग्रेसच्या गाळाला लागला असल्याची माहिती समोर आली आहे.

Big News | पवार घराण्यातील नवा वारसदार; राष्ट्रवादीच्या कोणत्या गटात करणार प्रवेश?

पुढील वर्षातील आगामी लोकसभा निवडणुकींसाठी आता अगदी काहीच कालावधी असताना आता राज्यातील राजकीय पक्षांकडून लोकसभेसाठी जयायत तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, आता महाविकास आघाडीमध्ये ही ह्या लोकसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा सुरू झाली आहे.(Political News)

महाराष्ट्र राज्यात लोकसभेच्या एकूण ४८ जागा असून, लोकसभेच्या आगामी निवडणुकांसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट व काँग्रेस ह्या तीन पक्षांची युती असलेल्या विरोधकांच्या महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकांच्या जागा वाटपाचे सूत्र हे निश्चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, अशातच आता समोर आलेल्या माहितीनुसार, काँग्रेस पक्ष हा येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये १५ ते १६ जागा लढवणार असल्याची चर्चा केली जात आहे. यानुसार काँग्रेसने मिळालेल्या जागांवर निवडणुकांसाठी तयारीदेखील सुरू केलेली  आहे.

Breaking news | काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या हातात बेड्या; ५ वर्षांचा कारावास

मविआच्या गोटात आणखी कोण?| (Political News)

ठाकरे- पवार- आणि पटोले यांच्या महाविकास आघाडीच्या गटात आणखी डाव्या-प्रागतिक पक्षांचीदेखील आघाडी आहे. दरम्यान, यात डावे पक्ष, समाजवादी पक्ष, शेकाप इत्यादि पक्षांचा समावेश आहे. यासोबतच, वंचित बहुजन आघाडीचीदेखील शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या सोबत राजकीय युती आहे. आणि त्यामुळेच ह्या जागांचे वाटप करताना ह्या लहान पक्षांचा देखील विचार करावा लागणार आहे. ह्या सर्व पक्षांना आगामी लोकसभा निवडणुकांसाठी जागा न दिल्यास विधानसभेसाठी जागा मविआला सोडाव्याच लागणार आहेत.

राऊतांना बोलायची सवयच – नाना पटोले

राज्यात आगामी लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात अद्याप फॉर्म्युला ठरलेला नाही. संजय राऊत हे कुठून आकडे देतात त्यांनाच माहीत. संजय राऊत यांना बोलायची सवयच आहे. २९ डिसेंबर रोजी काँग्रेसची बैठक आहे. त्या बैठकीत  मित्र पक्षांसोबत  लोकसभेच्या जागावाटपावर चर्चा होणार आहे. अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here