Deola Agro | देवळा ऍग्रो कंपनीची उत्कृष्ट कंपनी पुरस्कारासाठी निवड

0
74
Deola Agro
Deola Agro

Deola Agro | सोमनाथ जगताप – देवळा येथील ‘देवळा ऍग्रो कंपनी’ने आजपर्यंत शेतकऱ्यांचे संघटन करून शेतकऱ्यांच्या शेतमालाला आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देत वेगवेगळे शेतकरी हिताचे काम केल्यामुळे  कंपनीला राष्ट्रीय स्तरावरील बी. बी. एल. न्यूजकडून उत्कृष्ट कंपनी पुरस्कार जाहीर झाला आहे. अशी माहिती कंपनीचे संचालक प्रवीण मेधणे यांनी दिली. (Deola Agro)
कंपनीचे अध्यक्ष  केदा आहेर यांचे मार्गदर्शन व सर्व कंपनी कर्मचारी घटक तसेच शेतकऱ्यांनी कंपनीवर ठेवलेला विश्वास या सर्व गोष्टींच्या पाठबळामुळे राष्ट्रीय स्तराचा उत्कृष्ट कंपनी पुरस्कार देवळा ऍग्रो कंपनीला जाहीर झाला. सदर पुरस्काराचे वितरण २८ जानेवारी २०२४ रोजी दिनानाथ मंगेशकर कला अकॅडमी पणजी, गोवा येथे होणार असून
नाशिक जिल्ह्यातील देवळा या तालुक्याच्या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन २०१४ साली देवळा ऍग्रो प्रोड्यूसर कंपनीची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात ५६४ सभासदांपासून सुरुवात झालेली कंपनी आज जवळपास १२०० सभासदांना घेऊन प्रवास करत आहे.
२०१४ मध्ये छोटेखानी कृषि निविष्टा विक्रीचे दालन खोलण्यात आले. कंपनीने शेतकऱ्यांना कमी दरात किटकनाशके, बी-बियाणे व खते पुरविण्यास सुरुवात केली. दहा बाय दहाच्या गाळयात २०१४ सुरू झालेल्या या व्यवसायाचे आता १८०० स्केअर फुटाच्या ऍग्रो मॉलमध्ये रूपांतरित झाला. त्यानंतर कंपनीने स्मार्ट प्रकल्पांतर्गत सहभाग नोंदवून शेतकऱ्यांसाठी शितगृह आणि अत्याधुनिक पॅक हाऊसची उभारणी केली. देवळा तालुक्यातील मुख्य पीक कांदा असल्याने कंपनीने शेतकऱ्यांच्या शेतमालाला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.  शासनस्तरावर वे-कुल, रिलायन्स, बिग बास्केट, फ्रेश बास्केट, निंजा कार्ट, गो-फॉर फ्रेश यांसारख्या अनेक नामांकित २६ कंपनीशी सामंजस्य करार करून शेतकर्‍यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून दिली.

Datta Jayanti | खर्डेत दत्त जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह जल्लोषात सुरू

शेतकर्‍यांची कांदा बियाण्यात होणारी फसवणूक लक्षात घेऊन कंपनीने उच्च प्रतीचे बिजोत्पादन करून शेतकर्‍यांना सहकार्य करण्याचे ठरविले. त्या अनुषंगाने देशातील नामांकित संस्थेकडून कंपनीने मूलभूत बियाण्यांची मागणी केली. कंपनीचे कामकाज बघून एन. एच. आर. डी. एफ, नवी दिल्ली (डीओजीआर) राजगुरूनगर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, पंतनगर कृषी विद्यापीठ, धारवाड इत्यादी संस्थांनी कंपनीला मूलभूत बियाणांचा पुरवठा केला त्यामुळे कंपनीचा उच्च प्रतीच्या बियाणे निर्मितीचा मार्ग सुकर झाला. तसेच शेतकर्‍यांसाठी रब्बी व खरीप हंगामातील बियाणे अगदी काहीच दिवसात महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या पसंतीस उतरले. इतर राज्यातुन झालेल्या मागणीमुळे कंपनीने महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात इतर राज्यातही बियाणे विक्रीसाठी पाय रोवले.

Deola Agro | शेतकर्‍यांनी सुरू केलेल्या कंपनीसाठी ही अभिमानास्पद बाब

त्यानंतर देवळा ॲग्रो प्रोड्यूसर कंपनीने महाराष्ट्रातील इतर कंपन्यांनासह सन २०२० साली “महास्वराज्य फेडरेशन” ची निर्मिती केली. थोड्याच दिवसात फेडरेशनला शासनाकडून कांदा आणि चना खरेदीचे कामकाज मिळाले. २०१४ साली एका कर्मचार्‍यावर सुरू झालेला कंपनीचा प्रवास आज रोजी ३५ ते ४० कर्मचार्‍यांसोबत चालू असल्याचा कंपनीला अभिमान आहे. देवळा ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी व कंपनीने सुरू केलेले फेडरेशन याची सन २०२२-२०२३ ची आर्थिक उलाढाल १९० कोटी झालेली असून ही शेतकर्‍यांनी सुरू केलेल्या कंपनीसाठी अभिमानास्पद बाब आहे. अशी माहिती यावेळी कंपनीचे अध्यक्ष केदा आहेर व संचालक मंडळाने दिली. या कंपनीची उत्कृष्ट पुरस्कारासाठी निवड झाल्याने सर्व क्षेत्रांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here