Datta Jayanti | खर्डेत दत्त जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह जल्लोषात सुरू

0
21
Datta Jayanti
Datta Jayanti

Datta Jayanti | सोमनाथ जगताप – देवळा : मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा केला जातो. पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल तसेच सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या असताना देवगणांनी त्या आसुरी शक्‍तींना नष्ट करण्यासाठी ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला होता आणि त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तोच दिवस संपुर्ण महाराष्ट्रात `दत्तजयंती’ म्हणून साजरा कोला जातो.

Deola News | तालुका स्तरीय विज्ञान परिषदेत जनता विद्यालयाचा डंका

Datta Jayanti | कसं असणार अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन ?

दरम्यान, देवळा तालुक्यातील खर्डे येथे दत्त जयंती निमित्त मंगळवार (दि. १९) पासून दत्त मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या अखंड हरिनाम सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रम सुरू असून ह. भ. प. लक्ष्मण महाराज (कनकापूर), ह. भ. प. केवळ महाराज (खर्डे), ह. भ. प. लहू महाराज (नाशिक), ह. भ. प. दिगंबर महाराज (सातपूर), ह. भ. प. तानाजी महाराज (खर्डे), ह. भ. प. रमेश महाराज (आळंदी)  यांनी प्रवचन व कीर्तन सेवा बजावली आहे तर शुक्रवार (दि. 22) रोजी ह. भ. प. सूर्यवंशी सर लासलगाव, ह. भ. प. मोहन भागवत महाराज घोटी, ह. भ. प. कदम महाराज चांदवड, ह. भ. प. भगवान महाराज कचरे जालना, ह. भ. प. शिवाजी महाराज भडाणे, ह. भ. प. सदानंद महाराज उबाळे जालना यांचे प्रवचन व कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.

Manoj Jarange | शिष्टमंडळाचे साकडे मात्र मनोज जरांगे ‘या’ मागणीवर ठाम

मंगळवार (दि. 26) रोजी दत्त जयंती निमित्त सकाळी दहा वाजता ह. भ. प. सदानंद महाराज उबाळे यांचे काल्याचे किर्तन होऊन उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येऊन सप्ताहाची सांगता होईल. या कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ह. भ. प. मंडलिक महाराज व भजनी मंडळ यांनी केले आहे.
दरम्यान या अखंड हरिनाम सप्ताहात येणाऱ्या भाविकांसाठी त्र्यंबक भामरे, दोधा जाधव, कडू मोरे, हनुमान बोरसे, सुखदेव देवरे, वसंत शिंदे, नामदेव वाळुंज, नंदकुमार मोरे, हरी देवरे, वसंत पवार राजेंद्र अलई, रामभाऊ ठोंबरे, शिवदास मोरे, रमेश अलई, ज्ञानेश्वर रसाळ, निवृत्ती पवार, गजेंद्र शिंदे या अन्नदात्यांनी सकाळ संध्याकाळ जेवण तर शेवटच्या दिवशी मंगळवार (दि. 26) रोजी रामदास बिरारी, संजय बिरारी, सुरेश बिरारी यांनी महाप्रसादाचे आयोजन केले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here