Gold News | महिलांनो! जास्त सोने खरेदी करू नका अन्यथा…

0
20
Gold Silver Price 5 June 2024
Gold Silver Price 5 June 2024

Gold News |  भारतीय स्त्रीयांना आणि खासकरून विवाहित भारतीय स्त्रीयांना आभूषणांची फार आवड असते. सोन्याचा दागिना म्हणजे भारतीय नारीचा अतिशय जवळचा आणि आपुलकीचा विषय. आपल्याकडे विवाहाच्या वेळी माहेरकडून लेकीला आणि विवाहाच्या नंतर सासरच्यांकडून सुनेला दागिने हे भेट स्वरूपात दिले जातात. त्यामुळे भारतीय महिलांना दगिन्यांबद्दल एक विशेष आपुलकी असते. दरम्यान, विवाहित महिलांसाठी आता सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. (Gold News)

असा आहे निर्णय..?

चोरी थांबवण्यासाठी सरकारने काही कठोर नियम अंमलात आणले आहेत. दरम्यान, या निर्णयाच्या अंतर्गत आता तुमच्या घरात व घरातील महिलांकडे किती सोने असावे याबाबतची मर्यादा सरकारकडून निश्चित करण्यात आलेली आहे. प्राप्तिकर ह्या कायद्यानुसार घरातील एक विवाहित महिला ही जास्तीत जास्त ५०० ग्रॅम इतकेच सोने आपल्याजवळ बाळगू शकते किंवा घरात ठेवू शकते.

दरम्यान, एखादी अविवाहित महिला ही जास्तीत जास्त २५० ग्रॅमपर्यंत सोने हे आपल्याजवळ बाळगू शकते. दरम्यान, विवाहित किंवा अविवाहित पुरुष हे जास्तीत जास्त १०० ग्रॅम सोने आपल्याजवळ ठेवू शकतात. आणि विशेष म्हणजे इतके सोने बाळगल्यास तुम्हाला त्यासाठी कुठलाही पुरावा देण्याची गरज नसेल.(Gold News)

Gold Silver Rate | सोने- चांदी खरेदीचा हाच ‘गोल्डन चान्स’

जास्त सोने असल्यास?

ह्या आयकर विभागातर्फे घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा अतिरिक्त सोने आढळल्यास तुम्हाला प्रत्येक वर्षात आयकर रिटर्नमध्ये याबद्दलची माहिती देणे हे आवश्यक असेल. जर, तुमच्याकडे मर्यादेपेक्षा जास्त सोने असले आणि याबाबत तुम्ही आयकर विभागाला माहिती दिली नाही तर आयकर विभागाच्या छाप्यांमध्ये ते सोने जप्त केले जाणार आहे. त्यानंतर हे सोने बाळगणाऱ्याच्या विरुद्ध न्यायालयात खटला दाखल होईल. तसेच त्या व्यक्तीकडे असलेले सर्व दागिने हे  कायदेशीर मार्गानेच घेतलेले असल्याचे तुम्हाला सिद्ध करावे लागेल. अन्यथा तुमच्यावर कायदेशीर कारवाई देखील केली जाऊ शकते. (Gold News)

Gold Silver Price | सोने-चांदीची आघाडी कायम; असे आहेत दर

तसेच, दाखवलेल्या उत्पन्नातून आणि घर खर्चातून बचत करत किंवा तुम्हाला तुमच्या वारसा हक्काने तुम्हाला हे सोने मिळाले असल्यास तुम्हाला त्यावर कुठलाही कर भरावा लागत नाही. वारसा हक्काने मिळालेले सोने हे उघड केलेल्या उत्पन्न किंवा चुकीच्या मार्गाने आलेले नसल्याचे तुम्ही सिद्ध करायला हवे. तुम्हाला हे सोने कुठून मिळाले आणि कोणी दिले ? याबाबत सर्व माहिती असेल हवी. ही सर्व माहिती असल्यास चिंताग्रस्त होण्याची गरज नाही.

काय जप्त होणार?

वरील माहितीनुसार,  सरकारने नेमुम दिलेल्या मर्यादेतच तुमच्याकडे सोने असल्यास ते कुठल्याही तपासाच्या दरम्यान जप्त करता येणार नाही. तसेच हे नियम फक्त कुटुंबातील सदस्यांकडे असलेल्या सोन्यासाठीच लागू असतील. कुटुंबातील सदस्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणाचे सोने आढळल्यास ते जप्त होईल. (Gold News)

author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here