Nashik news | सुट्ट्या पैशांची चिंता मिटली; आता ऑनलाइन तिकीट काढा

0
28
Nashik news
Nashik news

Nashik news |   एसटी बसने प्रवास करताना अनेक वेळा प्रवाश्यांचे आणि वाहकांचे सुट्ट्या पैशांवरून वाद होतंणा आपल्याला दिसतात. दरम्यान, यावर तोडगा काढत प्रवासी हितासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दिवसेंदिवस वाढत असलेले आणि लोकप्रिय होत असलेले डिजीटलचे जाळे ह्याचा समावेश आता एसटी महामंडळानेदेखील केला आहे.(Nashik news)

दरम्यान, महाराष्ट्र राज्य एसटी परिवहन महामंडळ हे सध्या अनेक नवनवीन तसेच अत्याधुनिक सुविधा ह्या त्यांच्या प्रवासी सेवेच्या बाबतीत दाखल करीत आहेत. दरम्यान, त्यानुसार राज्य एसटी महामंडळाने पारंपरिक पद्धतीचा तिकीट ट्रे हा बंद केला आणि तिकीट मशीनद्वारे प्रवाश्यांना तिकीट देण्यास सुरुवात करण्यात आली. दरम्यान, आता त्यात सुधारणा करण्यात आली असून, एसटी प्रवाशांना क्यूआर कोड स्कॅन करून संबंधित तिकिटाची रक्कम अदा करता येणार आहे.(Nashik news)

Nashik Corona Alert | कोरोनाचं जोरदार पुनरागमन; आरोग्य यंत्रणा ॲक्शन मोडवर

यामुळे एसटीने प्रवाशांचे सुट्टया पैशांवरून होणारे वाद देखील यामुळे टळणार आहेत. बस तिकिटाचे दर हे पूर्णांकामध्ये असले तरीही सुट्टया पैशांवरून निर्माण होणारी समस्या ही अजूनही कायम आहे. मात्र, आता ह्या नव्या पद्धतीमुळे ही समस्यादेखील सुटणार आहे. एसटी महामंडळामध्ये सुद्धा तिकिटाच्या पेमेंटसाठी आता क्यूआर कोड स्कॅनिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामळे आता तिकीटासाठी सुट्ट्या पैशांची समस्या भेडसावणार नाही. गुगल पे, फोन पे यासारख्या ई पेमेंट वेबसाइटवरुन हे पेमेंट करता येणार आहे.

दरम्यान, एसटी महामंडळाच्या सर्व बसेसमध्ये सुविधा ही सुविधा पुरविली जाणार आहे. तसेच नाशिक विभागातून धावणाऱ्या जवळपास ७२० बसेसमध्ये ही ऑनलाइन पेमेंटची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. ही क्यूआर कोड पेमेन्टची मशिन्स सर्व कंडक्टर्सला देण्यात आली आहेत.(Nashik news)

Science Exhibition | धामणगाव येथे ’47’वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

डेबिट आणि क्रेडिट कार्डही चालणार

तिकीटासाठीचे पैसे ऑनलाइन पद्धतीने क्यूआर कोडच्या माध्यमातून तिकीट काढण्याची सुविधा ही राज्य परिवहन महामंडळाकडून उपलब्ध करून दिल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यामध्ये डेबिटआणि क्रेडिट कार्डदेखील पेमेंटसाठी चालणार आहे. सध्या तरी फक्त क्यूआर कोड वापरला जात असून, अद्याप नाशिकमध्ये डेबिट, क्रेडिट कार्ड व्यवस्था ही सुरु झालेली नाही.(Nashik news)

नाशिक विभागामध्ये तब्बल ७२० बसेससाथी ही सुविधा उपलब्ध झालेली असून, या सुविधेला नागरिकांची उत्तम पसंती मिळते आहे. कॅश लेस आर्थिक व्ययव्हरांना यामुळे चालना मिळणार आहे. तसेच यानंतर नाशिकमध्ये लवकरच क्रेडिट व डेबिट कार्ड पेमेंटही उपलब्ध करून देण्यात  येणार आहे.

– अरुण सिया (विभाग प्रमुख राज्य परिवहन महामंडळ) 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here