Breaking News | मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा…

0
35
Manoj Jarange
Manoj Jarange

Breaking News | मुख्यमंत्र्यांनी राज्यातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत. यात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले कि, सारथी योजनेमार्फत ३५०००  रोजगार आणि स्वयं रोजगाराचही शिक्षण दिलं आहे. सारथी आणि बार्टी या योजनेसाठी प्रत्येकी ३०० कोटी सरकारकडून देण्यात आले आहेत. तसेच महाज्योतीसाठी ५५० कोटी निधी देण्यात आला आहे. ७ हजार २०० ओबीसी विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना करण्यात आल्या आहेत. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीत ३ ते ४ पतीने वाढ करण्यात आली आहे.

Breaking news | संसदमहारत्न सुप्रिया सुळे यांच्यासह ४६ खासदार निलंबित

माराठा आरक्षणासंदर्भात अनेक मुद्द्यांवर भाष्य

राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरु आहे. यातच अनेक मुद्द्यांवर मुख्यमंत्री सध्या लक्ष वेधून घेत आहेत. त्यातच आज मुख्यमंत्री यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं. यावेळी बोलताना ते म्हणाले कि,  मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने एकतर्फी निर्णय घेतलेले नाही. मनोज जरांगेंचे उपोषण सोडवण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले असून मराठा आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध आहे. कुणावरही अन्याय न करता मराठा आरक्षण देण्यासाठी कार्यवाही सुरु आहे. तसेच सुप्रीम कोर्टात आरक्षण रद्द झालं होतं हि वस्तूस्थिती आहे. मराठा समाजाला प्रगतीसाठी आरक्षणाची गरज असतानातच राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कायम राहिली पाहिजे. आमचे सरकार मराठा आरक्षणासाठी सुप्रिम कोर्टात भक्कमपणे बाजू मांडत असून कुठलीही तृटी राहणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत.

आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी ५६ मराठा क्रांती मोर्चे निघालेत. या मुकमोर्च्यांना ‘मुका मोर्चा’ असं म्हणत हिणवलं गेलं. मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या आंदोलनांचा गैरफायदा कुणीही घेऊ नये. काही दिवसांपासून राज्यातील वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी सर्वांच्या भावना एकच असून मी कुठलीही जातपात मानत नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळालच पाहिजे हीच सर्वांची भावना आहे. इतरांच्या आरक्षणाला धक्का न देता मराठा समाजाला कायम टिकणारं असं आरक्षण देणार. तेलंगाना सरकारकडे उपलब्ध निजामकालीन कुणबी नोंदी तपासल्या जाणार आहेत.

Nashik Crime | नाशकात दारूवरून फटकारल्याने भाच्याने मामाचा केला खून

Breaking News | शिंदे समितीने चांगलं काम केलं…

शिंदे समितीने चांगलं काम केलं असून  ४०७ पानी आहवाल मिळाला आहे. मराठा समाजाला मागास वर्ग सिद्ध करण्यासाठी काही महत्वाचे पुरावे आमच्याकडे असून  त्यातील हमाल, माथाडी कामगार, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची माहिती त्या सगळ्याचा अहवाल, सुनावणी अहवाल आणि त्यांचे कागदपत्रे कोर्टात सादर करणं महत्वाच होतं मात्र मागे ते झालं नाही. आता मात्र त्याची पूर्तता केली जाईल. मागील सरकारने हा मुद्दा जेवढ्या गांभीर्याने घ्यायला हवा होता तेवढा तो घेतला नाही. फेब्रुवारीमध्ये मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन भरवणार आहोत. तसेच महाराज आमच्यासाठी दैवत आहेत म्हणुन मी त्यांची शपथ घेतली तसेच एकनाथ शिंदे दिलेला पाळतो हे याआधीही महाराष्ट्राने बघितलं आहे. हीच वेळ ओबिसी समाजावर जरी आली असती तरी आम्ही हेच केलं असतं. काम करायलाही धाडस लागतं, घाबरून घाबरून आम्ही काम करत नाही. बाळासाहेबांच्या जे मनात होतं तेच एकनाथ शिंदेने केलं.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here