Child Death Rate | नाशकात बालमृत्यूची धक्कादायक आकडेवारी समोर

0
28
Child Death Rate
Child Death Rate

Child Death Rate | लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात असं म्हटलं जातं परंतु सध्या राज्यभरात बालमृत्यू होण्याचं प्रमाण वाढताना दिसत आहे. देशभरात बालमृत्यू होण्याचं प्रमाण वाढू नये म्हणुन शासनस्तरावर विविध उपाययोजना केल्या जात असतात. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील बालमृत्यूंची चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत तब्बल 267 बालकांच्या मृत्यूची नोंद झाली असून यात 0 ते 1 वर्षाची 224 अर्भके तसेच 1 ते 5 वर्षातील 43 बालकांचा समावेश आहे.

Nashik | पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर आता नाशिकच्या वाहनांना सवलत नाही

Child Death Rate | बालमृत्यू कशाला म्हणतात?

जर एखाद्या बालकाचा जन्माच्या 30 दिवसांच्या आत मृत्यू झाला तर त्याला नवजात मृत्यू असं म्हणतात. अतिसार, स्तनपानाचा अभाव, कमी प्रतिकारशक्ती आणि बालरोगतज्ज्ञांच्या सल्ल्याचे पालन न केल्याने बालमृत्यूचे प्रमाण वाढत जोते. बालकाच्या जन्मानंतर एक वर्षाच्या आत होणाऱ्या मृत्यूला बालमृत्यू म्हटलं जातं. बालमृत्यू होण्यामागे विविध कारणं आहेत तसेच बालमृत्यूचे प्रमाण वाढण्यामागे प्रमुख कारण म्हणजे कुपोषण.

नाशिक हे भारतातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक मानलं जाणारं शहर आहे. नाशिक हे ऑटोमोबाईल हब मधील एक प्रमुख औद्योगिक केंद्र असून नाशिक शहरातील त्र्यंबकेश्वर, निफाड, नाशिक, दिंडोरीसारख्या तालुक्यांमध्ये होणाऱ्या बालमृत्यूचा आकडा चिंता वाढविणारा ठरत आहेत. राज्यासह नाशिक जिल्ह्यातील बालमृत्यू रोखण्यासाठी आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जात आहेत.

Seema Hiray | सिंहस्थाबाबत प्रशासन उदासीन; आ. हिरेंवर अधिकारी नाराज

बालमृत्यू रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून काय उपाययोजना?

नाशिक प्रशासनाकडून बालमृत्यू (Child Death Rate) रोखण्यासाठी शासकीय रुग्णालयात अनेक उपाययोजना केल्या जात असून गर्भवतींना पोषण आहार, नियमित तपासणीसह अनेक योजना राबविल्या जात आहेत. परंतु, तरीदेखील नाशकातील बालमृत्यू घटत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. गेल्या एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत 267 बालमृत्यूची नोंद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे. जिल्ह्यात मृत्यू झालेल्या या बालकांमध्ये 159 मुलांचा तर 108 मुलींचा समावेश आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here