Gold Rate | सोने-चांदीच्या किंमती ह्या गेल्या अनेक दिवसांपासून गगनाला भिडल्या होत्या. त्यामुळे ऐन लग्नसराईत ग्राहकांच्या खरेदीचा हिरमोड झाला होता. ऐन लग्नसराईच्या दिवसांत सोने-चांदीच्या किंमती ह्या वाढल्या असल्याने, मागील आठवड्यात सोने-चांदीच्या ह्या दरवाढीला किंचित ब्रेक लागला.
दरम्यान, आता ह्या आठवड्याची सुरुवातदेखील सोने-चांदीमधील घसरणीने झाली आहे. चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण झाली असून, सोने-चांदीच्या दरांत अजूनही घसरण होण्याची शक्यता आहे. दसरा, दिवाळी नंतर आता लागसराईत सोन्याला मान असतो. त्यामुळे किंमतीत जरा आणखी घसरण झाली, तर त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल. इस्राइल- हमास जागतिक युद्ध आणि यासारख्या इतर काही जागतिक घडामोडींमुळे सोने-चांदीच्या किंमतीवर याचा मोठा परिणाम झाला आहे.
दरम्यान, सध्या लग्नसराईचा काळ हा सुरु असून, त्यामुळे सर्वच गोष्टींमधील महागाई ही वाढलेली आहे. दरम्यान, लग्नसराईत सोने-चांदीला मोठी मागणी आहे. मागील काही महिन्यातच सोने-चांदीच्या किंमतीमध्ये मोठी वाढ बघायला मिळाली. दिवाळीपासूनच ह्या मौल्यवान धातूंच्या किंमतीत चढ-उतार हे सुरुच आहेत.
Gold scheme | सरकार देतंय सोने गुंतवणुकीची गोल्डन ऑफर
दरम्यान, आताच्या काळात सोनं महाग झालेलं असलं, तरी मागणी कमी झालेली नाही. आज सोन्याच्या किंमतींमध्ये किंचित घट झाली आहे. तर, आज सोन्याची किंमत ही २२० रुपयांनी कमी झाली असून, आज भारतात २२ कॅरेट सोन्याचा भाव हा ५,६९५ रुपये प्रति १ ग्रॅम तर, २४ कॅरेट सोन्याचा भाव हा ६,२१३ रुपये प्रति १ ग्रॅम असा आहे.
सोने-चांदीच्या दरात घसरण
दरम्यान, आज (दि. १२ डिसेंबर) रोजी सोन्याच्या किंमतीं मध्ये काही प्रमाणात घसरण झाली असून, आज १८ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव हा ४६,६०० रुपये असा असून, २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर हे ५६,९५० रुपये इतका आहे. तर, २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम शुद्ध सोन्याचा दर हा ६२,१३० रुपयांवर पोहोचला आहे. दरम्यान, यासोबतच चांदीच्या किंमतीतही आज काही प्रमाणात घघसरण झाली असून, आज एक किलो चांदीचा भाव हा ७५,८०० रुपये असा आहे. तर, काल म्हणजेच सोमवार (दि. ११) रोजी हा भाव ७६,००० रुपयांवर थांबला होता.
Gold silver rate | चांदी पाठोपाठ सोनेही घसरले; असे आहेत आजचे दर
कुठे कसे आहेत दर..?
महाराष्ट्रातील काही पुढील प्रमुख शहरांत असे असणार आहेत आज सोने-चांदीचे दर
१. पुणे – पुण्यात आज २४ कॅरेट सोन्याचा दर हा ६२,१३० रुपये प्रति तोळा असा आहे.
२. नाशिक – नाशिकमध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा दर हा ६२,१६० रुपये प्रति तोळा असा आहे.
३. नागपूर – नागपूरमध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा दर हा ६२,१३० रुपये प्रति तोळा असा आहे.
४. कोल्हापूर – कोल्हापूर मध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा दर हा ६२,१३० रुपये प्रति तोळा असा आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम