Onion Export | पिंपळगावला कांदा लिलाव सुरू; असा मिळतोय भाव

0
42
Onion Export
Onion Export

Onion Export |  केंद्र सरकारने लागू केलेल्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयानंतर नाशिकमधील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तसेच व्यापाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसत कांद्याचे लिलाव हे शुक्रवारपासून बंद ठेवण्यात आलेले होते. त्यामुळे नाशिक जिल्हया मधील विंचुर बाजार समिती वगळता सर्वच बाजार समित्यांमध्ये मोठा शुकशुकाट बघायला मिळत होता.

दरम्यान, बाजार समित्यांचे सभापती, तसेच निफाड तालुक्याचे आमदार दिलीप बनकर यांनी कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी यांच्यात शनिवार रोजी मध्यस्थी करत समन्वय घडवून आणला तसेच व्यापाऱ्यांनी योग्य दराने कांद्याचे भाव द्यावेत, केंद्राच्या निर्यातबंदीच्या ह्या निर्णयाच्या आडून कांदा उत्पादनाचे भाव पाडू नयेत, शेतकऱ्यांचे हे व्यापारी देत असलेल्या बाजारभावात समाधान होत नसल्यास संबंधित शेतकऱ्यांना त्यांचा कांदा घेऊन जाण्याची देखील मुभा असणार आहे.

Onion news | केंद्र सरकार कांदा उत्पादकांना ‘गुड न्यूज’ देईल; दिल्लीत मोठी बैठक

असा तोडगा कांदा प्रश्नी आमदार दिलीप बनकर यांनी शेतकरी आणि व्यापारी यांच्यात मध्यस्थी करत काढला आहे. सोबतच, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासह नितीन गडकरी यांचीही ते भेट घेणार असून, कांदा प्रश्नांवर त्यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी संगीतले आहे.

दरम्यान, त्यांच्या अथक प्रयत्नांनंतर नाशिकच्या पिंपळगाव येथील बाजार समितीत ठप्प असलेले कांद्याचे लिलाव हे शनिवारी सकाळच्या सुमारास सुरू करण्यात आले आहे. पिंपळगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरू होताच येथे लाल कांद्याचा भाव हा तब्बल दोन दिवस आधीच्या तुलनेत दीड हजार रुपयाने कोसळले आहेत. तब्बल २५० क्विंटल कांद्याचे यावेळी लिलाव झाले आहेत.

Breaking | चांदवडमध्ये सोमवारी शरद पवारांच्या उपस्थितीत ‘रास्ता रोको’

येथे लाल कांद्याला किमान १५०० तर, कमाल ३२२५, तसेच सरासरी २५०० रुपये असा दर मिळत आहे. शनिवारी झालेली कांद्याची आवक आणि बाजारभाव बघता शेतकऱ्यांना तब्बल चार लाख रुपयांची झळ पोहोचली आहे. कांद्याचे हे बाजारभाव कोसळल्यामुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे. मात्र, आता लाल कांदा  साठवू शकत नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नाइलाजास्तव हा भाव यावेळी स्वीकारावा लागला.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here