Sanjat Raut | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते तसेच खासदार संजय राऊत यांनी सणसणीत आरोप केले आहेत. मुंबईमधील जुहू बीचवर आज सकाळी मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः जाऊन तेथील स्वच्छतेच्या कामाचा आढावा घेतला. तसेच त्यांनी स्वत: साफसफाई देखील केली.
यामुळे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. त्यांची ही सर्व नाटकं असून, ती तात्काळ त्यांनी बंद केली पाहिजेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधी त्यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची सफाई केली पाहिजे. त्यांनी भ्रष्टाचारी लोकांची सफाई केली पाहिजे, असं यावेळी संजय राऊत म्हणाले आहेत. तीन घाशीराम कोतवाल हे सरकार चालवत आहेत. असं म्हणत राज्याच्या महायुती सरकारवर राऊत यांनी टीका केली आहे.
शिंदेंवर टिकास्त्र
मुंबईतील जुहू बीचवर जाऊन सफाई करणे हे मुख्यमंत्र्यांचं काम आहे का? मुंबईच्या महापालिका निवडणुका आपण घेत नाही. हे मुंबई महापालिकेचे काम आहे हे तेथील नगरसेवकांचे कामं आहेत. ठाण्यात, पुणे, नाशिक १४ महानगरपालिकांच्या निवडणुका ह्या तातडीने घ्या, मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारचे सोंग करण्याची वेळ येणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका ही ठाण्यातल्या नगरसेवकाप्रमाणे आहे, असा थेट निशाणा संजय राऊतांनी शिंदेंवर लगावला आहे.Sanjat Raut
Nagpur | कॉँग्रेसचे ठिय्या आंदोलन; नानांना पोलिसांनी उचलून नेले
“घाशीराम कोतवालचं राज्य”
राज्यात घाशीराम कोतवालांचं हे राज्य सुरू असून, तीन घाशीराम कोतवाल ह्या राज्यावर राज्य करीत आहेत. घाशीराम कोतवालांचा पेशवे काळातील कार्यकाळ आधी बघा. कशी लुटमार, कशी दरोडेखोरी त्यावेळी केली जात होती ते बघा. घाशीराम कोतवाल यांच्यावरती कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी होती.
पुण्यात त्यांनी ज्या पद्धतीने लुटमार सुरू केलेली असून, आपल्या बॉसेसच्या पैसे पोहचवायचा, सर्वच पोचवायचा. अशी ती सगळी कथा आहे घाशीराम कोतवाल हे राज्यात नाटक खूप गाजलेलं आहे. ती एक विकृतीच होती. आज राज्यात घाशीराम कोतवाल हे राज्य आहे. असं म्हणत शिंदे सरकारवर संजय राऊत यांनी टीका केली.
Deola | शेतकऱ्यांनी मुंबई आग्रा महामार्ग अडवून केलं रास्ता रोको आंदोलन
ललित पाटीलवर राऊत म्हणाले
ससून रुग्णालय तसेच ललित पाटील ड्रग्स प्रकरणात धरपकड सुरू आहे. हा पकडापकडी चा आणि लग्नाचा खेळ चालू आहे. ते सुद्धा नाटक आधी बंद करा. कॅबिनेटतील दोन मंत्र्यांचा याप्रकरणात सहभाग आहे. ड्रग्स मफिया ललित पाटील याला वर्षभर ससूनमध्ये ठेवण्यात आलं होतं. तिथे त्याचे साम्राज्य होते. त्याला प्रोटेक्शन देण्याचं काम यांनी केलं होतं. पोलिसांनी त्यांच्यापर्यंत हे प्रकरण पोहोचवावं.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम