सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : Deola | केंद्र सरकारने शुक्रवारी (दि. ८) रोजी कांद्यावर अचानक सम्पूर्ण निर्यात बंदी केल्याने तालुक्यातील उमराणे येथील स्व. निवृत्ती देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी मुंबई आग्रा महामार्ग अडवून रास्ता रोको आंदोलन केले.
Nashik | नाशिकमधील रेशन दुकाने 3 दिवस बंद..!
त्याचप्रमाणे या निर्यात बंदीच्या विरोधात देवळा येथे संतप्त शेतकऱ्यांनी पाच कंदील वर देखील रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात बाजार समितीचे सभापती योगेश आहेर यांच्या सह प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव, अतुल आहेर, कैलास सोनवणे, स्वप्निल आहेर, कारभारी जाधव, सुनिल भामरे, भास्कर पगार आदींसह व्यापारी, कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी निर्यात बंदी मागे घेण्यात येत नाही तोपर्यंत मार्केट मध्ये कांदा विक्री न करण्याचा तसेच व्यापाऱ्यांनी लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. (Deola)
गेल्या दोन महिन्यांपूर्वीच केंद्र सरकारने निर्यात शुल्क वाढविल्याने कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर घसरले होते. सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असून जेमतेम पाण्यावर शेतकऱ्यांनी थोड्या फार प्रमाणावर कांद्याची लागवड केली. कांद्याची आवक कमी झाल्याने सद्यस्थितीत कांद्यास चांगला दर मिळत होता. त्यामुळे ऐन दुष्काळात बळीराजाच्या पदरी दोन पैसे मिळत होते. मात्र केंद्र सरकारने अचानक निर्यात बंदी लागू केल्याने आज शुक्रवारी (दि. ८) रोजी कांदा लिलाव सुरू होताच भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने संतप्त शेतकरी, व्यापारी वर्गाने लिलाव बंद करीत मुंबई आग्रा महामार्गावर ठिय्या मांडत रास्ता रोको आंदोलन केले .व केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.
Nashik Crime | वणी पोलिस ठाण्यात संशयिताची पोलिसाला धक्काबुक्की
तब्बल तीन तास सुरू असलेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक सेवा ठप्प झाली होती. यावेळी तहसीलदार विजय सूर्यवंशी, स.पो.नि. दीपक पाटील यांनी भेट देऊन आंदोकलना संजविण्याचा प्रयत्न केला मात्र शेतकरी आंदोलनावर ठाम होते. यावेळी शेतकऱ्याच्या वतीने पंचायत समितीचे माजी उपसभापती धर्मा देवरे, माजी सरपंच बाळासाहेब देवरे यांच्या हस्ते तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू काका देवरे, जाणता राजा मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे यांच्या मध्यस्थीनंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. याप्रसंगी बाजार समितीचे सचिव तुषार गायकवाड उपस्थित होते.(Deola)
दरम्यान, महाराष्ट्रात सर्वत्र अवकाळी पाऊस आणि गारपीटने शेतकऱ्यांच्या शेतातील काढणीला आलेल्या कांदा, द्राक्ष पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अद्याप नूकसानीचे पंचनामे ही पुर्ण झाले नाहीत, अशावेळी केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने आर्थिक मदत जाहीर करणं गरजेचं असतांना नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून शुक्रवारी रात्री अचानक केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ३१ मार्च पर्यंत निर्बंध लादले, नोटा बंदी सारखी रात्री उशिरा वानिज्य विभागाने निर्यात बंदीची अदीसुचना जारी केली. मागील वर्षाच्या उन्हाळी कांदा संपतं आला असुन नुकताच कुठं लाल कांदा बाजारात दाखल झाला होता. अवकाळी पावसामुळे तोही प्रचंड प्रमाणात खराब झालेल्या अवस्थेत मेटाकुटीला आलेला शेतकरी तो बाजारात आणत आहे. मागणी ज्यात्त आणि पुरवठा कमी होत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळु लागले होते त्याला कुठेतरी तिन ते चार हजार रुपये क्विंटल दर मिळत असल्याने त्यांच्या आशा पल्लवित झाल्या असतांनाच शहरी ग्राहकांचं हित डोळ्यासमोर ठेवून ३१ मार्च पर्यंत कांदा निर्यात बंदी घातली. त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी दोघांनाही वाऱ्यावर सोडून केंद्र सरकारने महाराष्टातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम