Karthiki Ekadashi | पंढरपुरात भाविकांच्या संख्येत वाढ; दर्शनासाठी लागतोय 20 ते 22 तासांचा वेळ

0
15

Karthiki Ekadashi | आज कार्तिकी एकादशी असून आज देव चार महिन्यांच्या निद्रेतून जागे होत असतात. चार महिन्यापूर्वी म्हणजेच आषाढी अर्थात देवशयनी एकादशीला विठुराया निद्रिस्त अवस्थेत जातात आणि चातुर्मास संपल्यावर आज कार्तिकी एकादशीला देव जागे होत असतात. त्यामुळे आजच्या एकादशीला विठुरायाचे दर्शन हे वारकरी सांप्रदायासाठी अतिशय महत्वाचे मानले जात असतात. त्यामुळे पहाटेपासूनच पंढरपुरात भाविकांच्या संख्येत वाढ होतांना दिसत आहे. तर कालपर्यंत भाविकांची संख्या कमी होती पण पहाटेपासून हजारो भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाल्याने पंढरपूर नगरी विठ्ठूनामाने दुमदुमून गेले आहे. विशेष म्हणजे, काल सकाळी 8 वाजेपासून दर्शन रांगेत उभे असलेल्या भाविकांना 24 तासानंतर दर्शन मिळालेले आहे. तर सध्या देवाच्या पायावरील दर्शनाला सरासरी 20 ते 22 तासांचा वेळ लागत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

Nashik Crime | बागलाणमध्ये घटस्फोट झालेला नसतानाही, महिलेने थाटात केला दुसरा विवाह

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते आज पार पडली आहे. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कारही करण्यात आला. दरम्यान यावेळी बोलतांना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भागवत धर्माची पताका पिढ्यानुपिढ्या वारकरी संप्रदाय पुढे घेऊन जात आहेत. कितीही आक्रमणे झाली, संकटे आली तरी हा वारकरी संप्रदाय कधीच थांबला नाही. त्यांच्या पावलांनी नेहमीच पंढरीची वाट धरलेली.  महाराष्ट्र धर्म वारकऱ्यांनी जिवंत ठेवला असून महाराष्ट्र धर्माचा पाया ज्ञानेश्वर माऊलींनी घालून दिला तर संत तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढवलेला आहे. सर्व संतांनी त्यांच्या विचार आणि आचरणातून सामान्य माणसाला असामान्य बनवलेले आहे. अनेक पिढ्या बदलल्या असल्या परंतु भागवत धर्मावरील लोकांची श्रद्धा बदललेली नाही, असे फडणविस म्हणाले.

Info-tech news | २० हजारांच्या घवघवीत डिस्काउंटसह आताच ऑर्डर करा Google Pixel हा फोन

दुसऱ्या टप्प्यातील कामांनाही लवकरच सुरुवात होणार..

मागील वर्षीच्या कार्तिकीला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि परिवार देवता संवर्धनाची संकल्पना मांडली होती, तर या कार्तिकीला मंदिर संवर्धन विकासासाठी मंजूर करण्यात आलेल्या 73 कोटीच्या निधीतून पहिल्या टप्प्यातील 26 कोटीच्या विविध संवर्धन विकास कामांचे भूमिपूजन आज करण्यात आले आहे. त्याबद्दल समाधान वाटत असून हे काम अत्यंत वेगाने आणि उत्कृष्ट दर्जाचे होईल यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणा आणि संबंधित ठेकेदार यांनी काळजी घेतली पाहिजे, असे निर्देश उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेले आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यातील कामांनाही लवकरच सुरुवात करण्यात येणार असून श्री क्षेत्र पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची कामे सर्वांना सोबत आणि विश्वासात घेऊन करण्यात येतील, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here