Nashik news | केंद्र शासनाच्या ‘मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्र राष्ट्रीय सेवा योजना तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांतर्फे राबवण्यात आलेल्या “#सेल्फीविथमेरीमाती” या मोहिमेने ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये १० लाख ४२ हजार ५३८ सेल्फींचा नवा जागतिक विक्रम रचला आहे. दरम्यान, यात नाशिक जिल्ह्याने या उपक्रमांमध्ये लक्षणीय सहभाग नोंदवून, या उपक्रमात नाशिक जिल्ह्याने १ लाख ८४ हजार १२९ सेल्फी अपलोड केलेले आहेत.
या मोहिमेमध्ये एकूण २५ लाख ४५ हजार सेल्फी अपलोड झाले असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्वाधिक ६ लाख ४२ हजार ८५९ इतक्या सेल्फीचे योगदान दिले आहे. पुणे जिल्ह्याने या उपक्रमात ३ लाख ४५ हजार ९९३ सेल्फी अपलोड केलेल्या आहेत. गिनीजच्या विश्लेषणात यापैकी १० लाख ४२ हजार ५३९ इतक्या सेल्फींना मान्यता देण्यात आलेली आहे. यापूर्वी चीनने १ लाख २५ हजार सेल्फी करून हा विश्वविक्रम रचलेला होता.
या उपक्रमांतर्गत चीनचा हा विक्रम भारताने मोडीत काढला आहे. मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात नुकतेच गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र ‘एनएसएस’चे राज्य समन्वयक राजेश पांडे यांना यावेळी देण्यात आले. यावेळी पांडे यांनी कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांना हे प्रमाणपत्र सुपूर्द केले आहे.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा सभापती राहुल नार्वेकर, उपसभापती नीलम गोऱ्हे, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, तसेच शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा हे याठिकाणी उपस्थित होते.
तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्रकुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. राजेंद्र विखे पाटील, सागर वैद्य यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम