सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा एज्युकेशन सोसायटी संचालित, कर्मवीर रामराव पुंजाजी आहेर माध्यमिक विद्यालय सुभाषनगर (ता. देवळा) येथील माजी विद्यार्थ्यांचा गुरुवारी (दि. १६) रोजी स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
Mumbai | आदित्य ठाकरेंना अटक होणार..? BMC ने केला गुन्हा दाखल
सण 2001 वर्षातील इयत्ता 10 वीतील माजी विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी उपस्थित होते. यावेळी तब्बल 23 वर्षानंतर एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्यास मार्गदर्शक म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक वाय. ए. पगार, जनता विद्यालय खडकतळेचे मुख्याध्यापक बी.पी. गुंजाळ, जनता विद्यालय नांदगाव येथे कार्यरत असणारे आर. एस. आहेर, जिजामाता कन्या विद्यालय देवळा येथे कार्यरत असणाऱ्या एम.ए. आहेर आदी उपस्थित होते.
मालेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! तालुक्याची कन्या जिल्ह्यातील पहिली अग्निवीर जवान
यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या स्नेह मेळाव्यास नितीन आहेर, किरण पगार, प्रदीप गांगुर्डे, नारायण जाधव, संतोष कदम, मालती पगार, रोहिनी शिंदे आदी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात तब्बल 23 वर्षांनी एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना दरवर्षी शालेय साहित्य पुरवण्याचा संकल्प केला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम