सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | नाशिकच्या देवळा शहरात शुक्रवारी (दि. १७ ) रोजी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या गटसंपर्क कार्यालयात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ११ वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.
यावेळी देवळा तालुकाप्रमुख आणि मेशी येथील सरपंच बापूसाहेब जाधव यांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
Crime news | चोरट्यांचा मोर्चा शेतांकडे! नामपूरला दुसऱ्यांदा वीजपंपाची चोरी
याप्रसंगी सहसंपर्क प्रमुख विजय जगताप, तालुका संघटक प्रशांत शेवाळे , शहर प्रमुख विश्वनाथ गुंजाळ, उपतालुका प्रमुख विलास शिंदे , संघटक विजय आहेर आदींसह खंडू जाधव,
जितेंद्र भामरे, गोरख गांगुर्डे, ज्ञानेश्वर देवरे, नितीन शेवाळे, गोविंद सोनवणे, सतीश बोरसे, आबाजी बोरसे, देवा चव्हाण आदी तालुक्यातील तथा शहरातील शिवसैनिकही मोठ्या संख्येने यावेळी देवळा येथील संपर्क कार्यालयात उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सर्वांनीही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
Balasaheb Thackeray | बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन; दोन्ही गटांत राडा
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम