PM Kisan Yojna | देशातील कोट्यवधी शेतकर्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. पंतप्रधान किसान योजनेच्या १५ व्या हप्त्याची अनेक शेतकरी अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत होते, जी आता संपुष्टात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधील खुंटी येथून ८ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना १५ वा हप्ता हस्तांतरित केला आहे. तब्बल १८ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम भारतातील शेतकर्यांना हस्तांतरित करण्यात आलेली आहे. ही रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेली आहे.
Nashik News | फटाके फोडण्याच्या वादातून मित्रांनीच केला खून
कोणत्या लोकांना पीएम किसानचा लाभ नाही?
एखाद्या शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्याकडून जमीन घेतली आणि भाड्याने शेती केली असेल तर त्याला PM Kisan योजनेचा लाभ मिळू शकणार नाहीत. PM Kisan मध्ये जमिनीची मालकीची आवश्यक आहे. त्याचबरोबर शेतकरी किंवा कुटुंबातील कोणी घटनात्मक पद भूषवल्यास त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही. एवढेच नाही तर शेती करत असले तरी डॉक्टर, इंजिनीअर, सीए, वास्तुविशारद, वकील अशा व्यावसायिकांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच १०,००० रुपयांपेक्षा जास्त मासिक पेन्शन मिळवणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही हा लाभ मिळणार नाही. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप E-KYC केलेले नाही. त्यांनाही पीएम किसानचा लाभ मिळत नाही. पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेण्यासाठी E-KYC करणे खूप महत्वाचे आहे.
Nashik News | बाळाला बाहेर नेल्यावरून जाब विचाराल्याने पत्नीचा खून
आपले नाव यादीत चेक कसे करावे?
- पीएम किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- फार्मर्स कॉर्नरचा पर्याय दिसेल.
- या विभागात, लाभार्थी यादी पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गावाचे नाव निवडा.
- आता Get Report वर क्लिक करा, आता लाभार्थ्यांची संपूर्ण यादी तुमच्या समोर येईल.
यामध्ये तुम्ही तुमचे नाव सहज तपासू शकता.
शेतकऱ्यासाठी हेल्पलाइन नंबर
सरकारने शेतकऱ्यांसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केलेला आहे. तुम्ही PM Kisan सन्मान निधी योजनेअंतर्गत अर्ज केलेला असेल. त्याची स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्ही 155621 वर कॉल करू शकता. यावर तुम्हाला सर्व प्रकारची कृषी विषयक माहिती मिळू शकते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम