सोमनाथ जगताप- प्रतिनिधी : देवळा | देवळा बसस्थानकात रविवार (दि. १२) रोजी लालपरीचे अर्थात एसटी बसचे पूजन करत अनोखे लक्ष्मीपूजन करण्यात आले. ज्या बससेवेमुळे बसस्थानकांमध्ये रोजगार उपलब्ध होतो त्या एसटीबसेसलाच लक्ष्मी मानत येथील व्यावसायिकांनी तसेच आगारप्रमुख, एसटीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येत मनोभावे बसचे पूजन करत लक्ष्मीपूजन साजरे केले. यावेळी देवळा बसस्थानकात आलेल्या नाशिक-नंदुरबार या बसचे पूजन येथील सप्तश्रृंगी जनरल स्टोअर्सचे संचालक आणि सामाजिक कार्यकर्ते दादाजी आहेर आणि रोहिणी आहेर या दाम्पत्याने केले. सटाणा आगारप्रमुख राजेंद्र आहिरे, वाहतूक नियंत्रक भूषण आहेर, चालक-वाहक गणेश देवरे, योगेश आहेर, जे. एम. अहिरराव, कैलास बागूल, आर. एस. जाधव, पी. डी. जाधव, कैलास शिरसाठ यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला आहे.
देवळा | भाजपच्या आध्यात्मिक आघाडीच्या राज्य संयोजक पदी ह. भ. प. संजय धोंडगे
या बसस्थानकातून नाशिक, नगर, सटाणा, नंदुरबार, कळवण, सप्तश्रृंगी गड, मालेगाव, धुळे अशा अनेक बसेसची रोज ये-जा सुरू असते. यामुळे प्रवाशांची येथे नेहमीच वर्दळ असल्याने येथील लहानमोठ्या सर्वच व्यावसायिकांना छोटा-मोठा व्यवसाय करता येतो. या पार्श्वभूमीवर एसटी बसबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आणि बससेवेलाच लक्ष्मी मानत हे लक्ष्मीपूजन करण्यात आले. एसटी बसला फुलमाळांनी सजवत आणि पूजन करून फटाके फोडत आनंद साजरा करण्यात आला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहरप्रमुख दिलीप पाटील, मधुकर आहेर, कामिनी आहेर, रोहित आहेर, तात्या करंकाळ, अक्रम तांबोळी, करण शिरसाठ, रोशन खैरणार, कैलास पवार, सोमनाथ कानडे आदी कार्यकर्ते, व्यावसायिक तसेच प्रवाशी उपस्थित होते.
Nashik | दिवाळीत गावी जाणाऱ्यांची होतेय लूटमार; ज्यादा प्रवासभाडेबाबत करा तक्रार
“कोरोनाचे संकट, बसचा संप यातून बाहेर निघत नवनवीन योजनांच्या माध्यमातून एसटी पुन्हा एकदा प्रवाश्यांच्या सोयीसाठी गतिमान होत आहे. रोजगार निर्मितीतून व्यवसायास चालना देण्यासाठी बस एक उपयुक्त माध्यम सिद्ध होत आहे.- राजेंद्र आहिरे, सटाणा आगारप्रमुख.
“बसस्थानक हेच आमचे मंदिर आणि एसटीबस आणि प्रवासी हेच आमचे दैवत आम्ही मानतो. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आम्ही सर्व व्यवसाय बंधू एसटी चे पूजन करतो.” —– दादाजी आहेर (देवळा).
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम