सोमनाथ जगताप-प्रतिनिधी : देवळा | दि. २ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील भऊर येथील शेतकरी मयूर सुरेश पवार यांचा चोरीला गेलेला ट्रॅक्टर देवळा पोलिसांच्या अथक कामगिरीने सापडला असून आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत. देवळा पोलिसांच्या या कामगिरीचे ट्रॅक्टरमालकाने कौतुक केलेले आहे. भऊर (ता. देवळा) येथून शेतकरी मयूर पवार यांचा स्वराज कंपनीचा निळ्या रंगाचा 735 एक्स टी मॉडेल, क्र. MH. 41. 0637 ट्रॅक्टर (दि. २) नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास शेतातून अज्ञात चोरट्याने चोरला होता. याबाबत पवार यांनी देवळा पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
Crime news | नाशकात गुन्हेगारी सत्र थांबेना..! बेपत्ता तरुणीचा विहिरीत आढळला मृतदेह
तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असताना ट्रॅक्टर चोरीला जाणे हे मोठे संकट शेतकऱ्यापुढे उभे राहिले. त्यामुळे परिसरात या चोरीची जोरदार चर्चा रंगली होती. सदर चोरीतील आरोपी पकडणे आणि ट्रॅक्टर जप्त करणे हे मोठे आव्हान देवळा पोलीस स्टेशन समोर उभे ठाकले होते. देवळा पोलीस स्टेशनचे प्रभारी स.पो.नि. दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दामोदर काळे यांनी पोलीस नाईक निवृत्ती भोये, इंद्रजित बर्डे, सागर पाटील यांचे याकामी तपास पथक नेमले.पो.उ.नि. काळे यांनी पथकासह तपासाला सुरुवात केली. भऊर येथील ट्रॅक्टर कोणत्या दिशेला गेला याचा सुरुवातीला तपास सुरू झाला. देवळा शहरातील चहूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले होते. तेव्हा ट्रॅक्टर एका मोटरसायकलच्या मागाने मालेगावच्या दिशेने गेले हे तपासी अधिकाऱ्यांचे लक्षात आले. तपासी अधिकारी यांनी सीसीटीव्हीचा माग काढला तेव्हा त्याचे धागेदोरे मालेगाव मार्गे थेट चाळीसगाव तालुक्या पर्यंत दिसले. पोलिसांनी सर्व तांत्रिक बाबी तपासल्या आणि त्यातून एक आरोपी निष्पन्न केला.
Maharashtra politics | शपथ घेण्यापूर्वी मी दोन तास प्रॅक्टीस केली – डॉ. भारती पवार
आरोपीचा मोबाईल नंबरच्या माध्यमातून पोलिसांनी सलग तीन दिवस तपास सुरू केल्यानंतर त्यातील एक आरोपी नाना युवराज ठाकरे रा. अजंग (ता. मालेगाव) यास चांदवड येथे मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता दुसरा आरोपी रोहित हिरामण शिंदे रा. नारायनखेड (ता. चांदवड) याच्याकडे ट्रॅक्टर असल्याची माहिती त्याने दिली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सावधगिरीने दुसरा आरोपी रोहित याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे सदर ट्रॅक्टर मिळाला. कुठल्याही प्रकारचे धागेदोरे नसताना पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या जोरावर सदर आरोपी ट्रॅक्टरसह मिळवण्यास यश मिळवलेले आहे. चोरीस गेलेले ट्रॅक्टर मिळूनआल्याने फिर्यादी शेतकरी यांनी देवळा पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. सदर तपास पोलीस उपविभागीय अधिकारी संजय बाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम