Nashik News | नाशिक शहराच्या रस्ते स्वच्छतेसाठी नाशिक महापालिकेने इटलीहून खरेदी केलेले ३३ कोटींचे चार यांत्रिकी झाडू शहरात दाखल झाले असून, छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील जलशुद्धीकरण केंद्रात हे झाडू ठेवण्यात आले आहेत.
दिवाळीनंतर आरटीओ पासिंग होणार आहे व त्यानंतर हे काम सुरू होईल. शहरातील जवळपास २८० किलोमीटरच्या मुख्य रस्त्यांची यांत्रिकी झाडूच्या माध्यमातून सफाई होणार आहे. रस्ते झाडताना धूळ उडते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने यांत्रिकी झाडूने रात्रीच्या वेळी रस्त्यांची स्वच्छता केली जाणार आहे.
नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम अंतर्गत नाशिक महापालिकेला प्राप्त झालेल्या निधीतून विविध उपक्रम राबविले जाताहेत. यात हवा गुणवत्ता नियंत्रणाबरोबर रोजचे निरीक्षण नोंदविण्यासाठी केंद्र उभारणे, विद्युतदाहिनी बसविणे, बांधकाम डेब्रिज विल्हेवाट प्रकल्प, दुभाजकांमध्ये शोष वनस्पती, एकीकृत सिग्नल प्रणाली, सुलभ शौचालयांवर सोलर रूफ टॉप बसविणे इत्यादि काम होणार आहे.
Nashik News | केंद्र सरकारने ग्राहकांना फुटक कांदा द्यावा पण शेतकऱ्यांचे शोषण करू नये – आ. बनकर
महापालिकेच्या यांत्रिकी विभागाकडून रस्ते झाडण्यासाठी यांत्रिकी झाडू (रोड स्विपर) हे इटलीवरून खरेदी करण्यात आले असून, ह्या यांत्रिकी झाडूंची आता डिलिव्हरी झाली आहे. २० ऑगस्ट २०२१ ला सहा विभागांत हे यांत्रिक झाडू खरेदीचा निर्णय घेण्यात आला. पाच वर्षांसाठी देखभाल-दुरुस्तीसह ३३ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव महासभेवर मंजूर झाला. एप्रिल २०२३ मध्ये कार्यारंभाचे आदेश देण्यात आले.
कचरा वहन ऑपरेटरमार्फत
शहरात २,१५० किलोमीटर लांबीचे रस्ते आहे. एका यांत्रिकी झाडूसाठी दोन कोटी सहा लाख रुपये, असे एकूण १२ कोटी ३६ लाख रुपये हे खर्च होणार आहे. पुढील पाच वर्षांत ऑपरेशन, देखभाल दुरुस्ती, इंधन, मनुष्यबळ पुरविण्यासाठी यांना दरमहा पाच लाख ८५ हजार ७०० रुपये इतका खर्च होणार आहे.
साडेतीन मीटर रुंद रस्त्यावर एका यांत्रिकी झाडूमार्फत ४० किलोमीटरप्रमाणे प्रतिदिन १६० किलोमीटर रस्त्याची सफाई केली जाणार आहे. कचरा वहन ऑपरेटरमार्फत गोळा केला जाईल.
Crime News | मालेगावात भाऊ ठरला वैरी; भावानेच केला भावाचा खून
अंतर्गत रस्त्यावर सफाई कर्मचारी
नाशिक महापालिकेकडे २,८०० सफाई कर्मचारी आणि आउटसोर्सिंगचे ७०० कर्मचाऱ्यांमार्फत शहरची सफाई होते. एका कर्मचाऱ्याकडून दोन्ही बाजूंनी ५०० मीटर, असे साधारण एक किलोमीटर रस्ते झाडलोट अपेक्षित असते. यांत्रिकी झाडूच्या माध्यमातून सफाई सुरू झाल्यास १६० कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ वाचेल. ते मनुष्यबळ अंतर्गत रस्त्यांची झाडलोट करण्यासाठी वापरले जाणार आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम