देवळा | खर्डे (ता. देवळा) येथे मंगळवारी (दि. ३१) पासून मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा म्हणून समस्त सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरु केले आहे. या सकल मराठा समाजाच्या या लाक्षणिक उपोषणास इतर सर्व समाजातील संघटना, पदाधिकारी, कार्यकर्त्यानी आपला पाठिंबा दर्शविला आहे. उपोषणस्थळी खर्डे पंचक्रोशीत समाज बांधव आपली हजेरी लावत असून, आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी घोषणाबाजी करत आरक्षण मिळत नसल्याबद्दल राजकर्त्यांवर नाराजी व्यक्त केली जात आहे.
मराठा आरक्षण | अखेर निर्णय नाहीच; मुख्यमंत्र्यांना हवाय आणखी वेळ!
मंगळवारी (दि. ३१) रोजी तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना निवेदन सादर करण्यात येऊन आरक्षणावर तोडगा निघत नाही तोपर्यंत साखळी उपोषण सुरु ठेवण्याचा निर्णय समाज बांधवानी घेतला आहे. खर्डे येथे सुरु करण्यात आलेल्या या साखळी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी वाजगांव, शेरी, वडाळा येथील संजय गायकवाड, अमोल आहेर, विनोद देवरे, शैलेंद्र देवरे, दीपक देवरे, धनराज सोनवणे, सुदाम सोनवणे, राकेश देवरे, प्रभाकर देवरे, प्रदीप सोनवणे, गोरख सोनवणे, सुनील देवरे, वैजनाथ देवरे, सागर देवरे, मोती देवरे, दिनेश देवरे आदींनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. यावेळी खर्डे उपसरपंच बापू जाधव, शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख विजय जगताप, संदीप पवार, माधव ठोंबरे, सचिन गांगुर्डे, शशिकांत ठाकरे, शशिकांत पवार, भाऊसाहेब मोरे उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम