मराठा आरक्षण | देवळा येथे मराठा समाजाच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

0
54

मराठा आरक्षण | देवळा येथे मंगळवारी (दि. ३१) रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा म्हणून समस्त सकल मराठा समाजाच्या वतीने देवळा पाचकंदीलवर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. सकल मराठा समाजाच्या या लाक्षणिक उपोषणास इतर सर्व समाजातील संघटना, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपला पाठिंबा दर्शविला. तर उपोषणाला मराठा समाजातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला.

Maharashtra | राज्यातील 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

उपोषणस्थळी तालुक्यातील खेड्यापाड्यातील सकल मराठा समाज बांधवानी हजेरी लावून आरक्षण मिळाले पाहिजे अशी मागणी केली. उपोषणाला जोरदार असा प्रतिसाद लाभला. सायंकाळी तहसीलदार विजय सूर्यवंशी, स.पो.नि. दीपक पाटील यांना विद्यार्थिनींच्या हस्ते निवेदन सादर करण्यात आले. लाक्षणिक उपोषण अत्यंत शांततेच्या मार्गाने करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हा नेते केदा आहेर, बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, मविप्र संचालक विजय पगार, आदींसह पंडितराव निकम, शिवव्याख्याते यशवंत गोसावी, नगरसेवक जितेंद्र आहेर,अशोक आहेर, संतोष शिंदे, मनोज आहेर,अतुल पवार,  माजी नगरसेवक उमेश आहेर, नगरसेविका भाग्यश्री पवार, बबिता देवरे, जगदीश पवार, पुंडलिक आहेर, हिरामण आहेर, दिलीप आहेर, संभाजी आहेर, नानू आहेर, मुन्ना आहेर, किशोर आहेर, चिंतामण आहेर, अतुल आहेर, राजीव पगार, सचिन सूर्यवंशी, दिलीप आहेर, राजेंद्र पगार, दिनेश पगार, कैलास देवरे, हर्षद भामरे, राजेंद्र आहेर, दिनकर आहेर, दिनकर निकम, रामा पाटील, सचिन आहेर, बाबाजी पाटील, स्वप्नील सावंत, प्रसाद देशमुख, रवी सावकार, स्वप्नील आहेर, दादा आहेर, दीपक जाधव, गोकुळ आहेर यांचेसह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते.

Breaking News | चांदवड येथे मराठा आंदोलकांनी टायर जाळले तर नाशकात भव्य पायी मूक मोर्चा

दरम्यान देवळा तालुक्यातील खर्डे येथे मंगळवारी (दि. ३१) रोजी सुरु करण्यात आलेल्या साखळी उपोषणाला पंचक्रोशीतील समाज बांधवानी उपस्थिती लावून मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा देत आरक्षणाच्या मागणीचे निवेदन तहसीलदारांना दिले. यावेळी खर्डे गावासह वाजगाव, वडाळा, कनकापूर, शेरी, वार्शी, मुलूखवाडी येथील मराठा समाज बांधव उपस्थित होते.  मंगळवारी देवळा येथे आणि तालुक्यात काही गावात सुरु असलेल्या मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी राजकीय हेवेदावे बाजूला सारून सर्वपक्षीय पदाधिकारी एकवटले असतांना तालुक्यातील सत्ताधारी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी उपोषणस्थळी पाठ फिरविल्याने यावेळी समाज बांधवानी नाराजी व्यक्त केली. त्यांची अनुपस्थिती मुळे उलटसुलट चर्चंना उधाण आलेले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here