Deola | तालुक्यात कालव्याच्या पाण्यावरून होऊ शकतं ‘गृह युद्ध’

0
18

Deola | कसमादे भागातील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे नद्या आणि कालव्यांना पाणी सोडण्याची मागणी वाढणार आहे. चणकापूरच्या उजव्या वाढीव कालव्याला पाणी सोडावे यासाठी तालुक्याच्या पूर्व भागातील जनतेने बैठका घेउन तसेच शासकीय अधिकाऱ्यांना निवेदने देत जनरेटा वाढवला आहे. इतर भागातदेखील पाणीपुरवठा आणि शेतीसाठी आत्तापासूनच पाण्याची मागणी होऊ लागलेली आहे. नद्या, धरणे, तलाव कोरडे पडल्याने पाण्यासाठी वादविवाद होऊ लागल्याने पाण्यावरून नजीकच्या काळात मतभेदाचे प्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाणीप्रश्न हा कळीचा मुद्दा ठरणार हे मात्र नक्की!. दुसरीकडे प्रशासनाने यातून मार्ग काढून वेळीच नियोजन, उपाययोजना करण्याची गरज आहे.

Maratha reservation| मराठे पेटले; आधी गाडी फोडली,आता एसटी..

कसमादे तालुक्यांचा पूर्व भाग जलसिंचनाच्या दृष्टीने तसा तहानलेलाच आहे. गिरणा, आरम, मोसम नद्यांसह काही कालव्यांमुळे काही भागाची तहान भागत असली तरी इतर भाग तहानलेलाच दिसत आहे. यंदा कसमादे भागात पुरेसा पाऊस न झाल्याने येथील छोटी-मोठी धरणे, नद्या, तलाव कोरडेच आहेत. यामुळे आगामी काळात सगळ्यांना पिण्यासाठी असो वा शेतीसाठी पाणी पुरवणे अवघड जाणार आहे. त्यातच आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने या पाणीप्रश्नाबाबत उमेदवारांना आणि तेथील नेत्यांना उत्तरे द्यावी लागणार आहेत.

कांदा उघड्यावर टाकण्याची वेळ येते तेव्हा…; पाशा पटेलांचा सरकारला घरचा आहेर

कसमादे तालुक्यातील चणकापूर, पुनंद, हरणबारी, केळझर या धरणातून पाण्याचा प्रामुख्याने पुरवठा होत असतो. परंतु या धरणांतील पाणीसाठा मर्यादित असल्याने संपूर्ण कसमादे भागाला पाणीपुरवठा करण्यास मर्यादा पडतात. यामुळे पाण्यावरून गावागावांत वादविवाद होण्याची शक्यता वाढलेली आहे. यासाठी या भागाला पाणीपुरवठ्याचा नवीन सक्षम पर्याय उपलब्ध व्हायला हवा. सुरगाणामधील पावसाचे वाहून जाणारे पाणी वळण बंधाऱ्याद्वारे अडवून ते गिरणा खोऱ्यात वळवण्याची गरज आहे. आपले हक्काचे पाणी मिळवण्यासाठी आणि कसमादेसहीत नांदगाव, सुरगाणा आणि इतर परिसराला सुजलाम-सुफलाम करण्यासाठी वांजुळपाणी संघर्ष समिती गेल्या सात ते आठ वर्षांपासून शासनदरबारी तसेच जनतेतआवाज उठवत आहे. नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्पास राज्यशासनाच्या 8 हजार कोटीच्या निधीतून मान्यता देण्याचे सूतोवाच मागेच झाले होते. त्याबाबतच्या कामाकडेदेखील जनता आशा लावून बसली आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी याकामी पुढाकार घेण्याची गरज आहे. अन्यथा येत्या काळात पाण्यावरून बिकट प्रसंग उद्भविण्याची शक्यता वाढलेली आहे.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here