Dada bhuse: पालकमंत्री भूसेंच्या आक्रमक भूमिकेने नाशिक शहरात पोलिसांची धडाकेबाज कारवाई

0
21

Dada bhuse: नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या आक्रमक पावित्र्यानंतर शहरात पोलिसांनी अवैध धंदे चालकांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मंत्री भुसे यांनी काल शहरातील विविध विषयांवर लक्ष घालत बैठक आयोजित केली होती यावेळी पालकमंत्र्यांनी आठ दिवसांचा अल्टिमेटम दिल्याने पोलिस यंत्रणा चांगलीच सक्रिय झाल्याचे आज दिसले. शहरात मोठया प्रमाणात कारवाईच्या माध्यमांतून अवैध धंदे चालकांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पालकमंत्र्यांच्या भूमिकेचे नागरिकांनी स्वागत केले असून भविष्यात कारवाईच्या माध्यमातून नाशिकला सुरक्षित अन् संस्कृत शहराची ओळख कायम ठेवावी अशी मागणी नागरिकांनी यावेळी केली आहे. (Dada bhuse)

कॉफी शॉपमध्ये अनाधिकृतपणे कंपार्टमेंट पार्टीशन तयार करून तरूण तरूणींना बेकायदेशिरपणे प्रायव्हसी पुरवुण सदर ठिकाणी अंमली पदार्थांचे – सेवन व अश्लिल कृत्यांना आसरा दिला जात असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. याअनुषंगाने गंगापुर पोलीस ठाणे हद्दीत आठ कॅफे शॉपवर कारवाई करण्यात आली. पोलीस विभाग व महानगरपालिका यांची संयुक्त पथके निर्माण करून अनाधिकृतपणे कंपार्टमेंट / पार्टीशन तयार करून तरूण तरूणींना बेकायदेशिरपणे प्रायव्हसी पुरविणाऱ्या एकुण ०८ कॉफी शॉप मधील अनधिकृत बांधकाम निष्काशित करण्यात आले. तसेच सदरचे कॅफे महानगरपालिकेकडुन सिल करण्यात आले आहेत.

 

कारवाई करण्यात आलेल्या आस्थापणा पुढील प्रमाणे.

१) सिझर कॅफे, हॉलमार्क चौक, कॉलेजरोड, नाशिक २) यारी कट्टा, सुयोजित कॉम्पलेक्स, नाशिक ३) कॅफे क्लासिक डे लाईट, सुयोजित कॉम्पलेक्स, नाशिक ४) हॅरोज किचन कॅफे, सुयोजित कॉम्पलेक्स, नाशिक ५) पॉकेट कॅफे, श्रध्दा मॉल, कॉलेजरोड, नाशिक ६) वालाज कॅफे टेरीया, श्रध्दा मॉल, कॉलेजरोड, नाशिक ७) मुरली कॅफे, रामराज्य सोसायटी, महात्मा नगर, नाशिक ८) मॅझिक वर्ल्ड कॅफे, पी. एम. पी. एस. कॉलेज जवळ, डि. के. नगर, नाशिक,

सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणा-या टवाळखोर इसमांवर कारवाई

पोलीस आयुक्तालय हददीत अंमली पदार्थाची विक्री व सेवन करणारे सराईत इसम तसेच सार्वजनिक ठिकाणी उपद्रव तयार करून शहरातील शांतता बिघडवणारे इसमांचा शोध घेवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. अंमली पदार्थाचे विक्री / सेवन करणारे रेकॉर्डवरील सराईत इसमांचा शोध घेणेकामी तसेच टवाळखोरावर कारवाई करणेकामी  विशेष पथके तयार करून सर्व पोलीस ठाणे हददीत आज रोजी विशेष मोहिम राबविण्यात आली.

सदर पथकांनी विशेष मोहिमे दरम्यान परिमंडळ- १ हददीत सार्वजनीक ठिकाणी उपद्रव करणा-या २५० इसमांविरुध्द व परिमंडळ-२ हददीतील ९९ इसमांविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११२/११७ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी शाळा / महाविदयालयातील मोकळ्या पटांगणात धुम्रपान करणारे तसेच तंबाखुजन्य पदार्थाची विक्री करणारे एकुण ३३ इसमाविरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे. यापुढे टवाळखोरांचे धाबे दणाणले आहेत. (Dada bhuse)

नाशिकरोड पोलीस स्टेशन हद्दीत शिंदे गाव परीसरात अंमली पदार्थ मिळून आल्याने त्या अनुषंगाने हद्दीतील बंद असलेले गोडावून, आस्थापनांमधील अवैध, बेकायदेशीर साठ्यांबाबत माहिती प्राप्त करून योग्य ती कारवाई कारवाई करण्यात आली. यावेळी गाळयाचे कुलूप तोडून छापा टाकला असता गाळ्यामध्ये सन १९९८-२००० मधील भारतीय बनावटीचा जुना विदेशी दारूचा साठा मिळून आल्याने त्याची मोजदाद करून तेथून एकुण २,३२,२१२/- रूपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. पळसे येथील फुलेनगर, देवी रोड, गट नं. १३८६, मधील रोडलगत असलेल्या गाळयामध्ये सदर माल मिळून आल्याने गाळयाचा मालक तसेच गाळ्यात अवैधरित्या विदेशी दारूचा साठा करणारा इसम यांचेविरुध्द नाशिकरोड पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हयाचा अधिक तपास सपोनि गणेश शेळके करत आहेत.

अंमली पदार्थाची विक्री करणारे सराईत गुन्हेगार ताब्यात अंमली पदार्थ विरोधी पथक व गुन्हेशाखेची कारवाई

पोलीस आयुक्तालय हददीत चार विशेष पथके स्थापन करून अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन करणेबाबत आदेशीत केले होते. त्यापैकी अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाईमध्ये सातत्य ठेवुन अंमली पदार्थांची विक्री करणारे व्यक्तींची धरपकड करून कारवाया केलेल्या आहेत. त्यामध्ये सन २०२३ मध्ये अंमली पदार्थ बाळगणे व खरेदी विक्री संदर्भाने १० गुन्हे व अंमली पदार्थ सेवन करण्याच्या ०५ व शाळा / महाविदयालय परिसरात सार्वजनिक ठिकाणी तंबाखुजन्य पदार्थ विक्री व सेवन करणा-या इसमांवर कोटपा कायदयाअंतर्गत ३५७ केसेस करण्यात आलेल्या आहेत.

वरील गुन्हयांमध्ये इतर आरोपी निष्पन्न झाले असुन त्यांचा शोध घेण्यासाठी एकूण सहा तपास पथके कार्यरत आहेत. लवकरच वरील तिन्ही गुन्हयांमध्ये निष्पन्न असलेल्या आरोपीतांना अटक करण्यात येवुन सध्या अटक व निष्पन्न आरोपीतांच्या चौकशी मधुन सदर गुन्हयांच्या मुळा पर्यंत जावुन एकमेकामध्ये असलेली पुराव्याची शृंखला शोधुन गुन्हयामध्ये सबळ पुरावे हस्तगत करण्यात येत आहेत. (Dada bhuse)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here