Nashik: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सरकार तर्फे अभिनव उपक्रम देशभरात राबविण्यात येत आहेत. देशासाठी बलिदान दिलेल्या शहिदांच्या स्मृतींना उजाळा देऊन त्यांना वंदन करण्यासाठी ‘मिट्टी को नमन, वीरों का वंदन या घोषवाक्यासह देशभरात ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ हे अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी देश प्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यांनी केले आहे. (Nashik)
Nashik road: नाशिक रोड ते द्वारका वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार, पालकमंत्र्यांनी टाकले हे पाऊल
देशभरात 9 ते २० ऑगस्ट २०२३ दरम्यान हे अभियान गाव आणि गटस्तरावर, स्थानिक स्वराज्य संस्था, पालिका, नगरपंचायत, तसेच महापालिका क्षेत्रात आयोजित करण्यात येणार आहे. त्याच पार्श्भूमीवर नाशिक जिल्ह्यात देखील हे अभियान राबविण्यात येत आहे. शहीद जवानांच्या स्मृतींना उजाळा देऊन नमनासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक ‘शिला फलक’ उभारण्यात येणार आहे. पालिका, महापालिका क्षेत्रात एक असे शिला फलक उभारण्यात येतील. त्यावर स्थानिक शहीद, वीर, स्वातंत्र्यसैनिकांची नावे असतील. हे शिला फलक १५ ऑगस्टपर्यंत उभारण्यात येणार आहेत.
‘वसुधा वंदन’ उपक्रमात प्रत्येक गावात योग्य ठिकाण निवडून तेथे ७५ देशी रोपांची लागवड करून ‘अमृत वाटिका’ तयार करण्यात येतील. तर देश, स्वातंत्र्यासाठी व सुरक्षेसाठी बलिदान दिलेल्या वीरांचा, स्वातंत्र्यसैनिकांचा, तसेच त्यांच्या परिवारातील सदस्यांचा सन्मान यावेळी करण्यात येणार आहे. ‘हर घर तिरंगा’ अभियान १३ ते १५ ऑगस्टदरम्यान राबविण्यात येणार आहे. देश प्रेमी प्रत्येक भारतीयाने आपले घर तसेच इमारतीवर तिरंगा ध्वज फडकवावा. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, विद्यापीठ, महाविद्यालये, शाळा, सर्व दुकाने, आस्थापनांनी या उपक्रमात स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.
पंचप्रण उपक्रमात शपथ ‘पंचप्रण’ ( शपथ घेणे) या उपक्रमात प्रत्येक शासकीय . कार्यालयात मातीचे प्रज्वलित दिवे. हातात घेऊन शपथ घेतली जाणार आहे. ‘ध्वजारोहण’ कार्यक्रमात अमृत सरोवर, शाळा, ग्रामपंचायत अशा एका योग्य ठिकाणी कार्यक्रम घेऊन राष्ट्रगीत गायन व तिरंगा फडकविण्यात… येतील. स्थानिक लोकप्रतिनिधी, युवक मंडळ, महिला बचतगट, शेतकरी मंडळ यांना सहभागी करून घ्यावे. प्रत्येक गावस्तरावर ९ ते १५ ऑगस्टपर्यंत हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून १६ ते २० ऑगस्ट या कालावधीत महापालिका पालिका, पंचायतस्तरावर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आ कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन पालकमंत्री भुसे यांनी केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम