Crime breaking : काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असलेला लाखोंचा रेशनसाठा जप्त

0
20

Black market sale of ration rice : काळया बाजारात ६ लाख ३६ हजार रुपयांचा रेशनचा तांदूळ विक्रीसाठी घेऊन जात असतांना पोलिसांनी तो सापळा रचून पकडला. या घटनेत घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोटी – खैरगांव मार्गावर आयशर क्रमांक ( एमएच, १७ एजी, ५६६६ ) वाहनातून हा तांदूळ काळया बाजारात विक्रीसाठी नेला जात होता.

https://thepointnow.in/nashik-road-crime/

दरम्यान संशयित आरोपी भाऊसाहेब नेरकर,श्रावण सोनवणे रा. कोकमठाण (ता. संगमनेर), अर्जुन मरसाळे रा. कोपरगाव यांना अटक करण्यात आली आहे. आयशर वाहनासहित २७० गोण्या तांदूळ असा १८ लाख ३६ हजार रुपा्यांचा मुद्देसूद पोलिसांनी जप्त केला आहे. या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शाहजी उमाप यांना गोपनीय पद्धतीने मिळताच त्यांनी घोटीचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांना खबर दिली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने पाळत ठेवली. साडे बारा वाजे दरम्यान आयशर वाहन हे रेशनचा तांदूळ खैरगांव मार्गावर खाली करण्यासाठी आला असता, पोलीस पथकाने छापा टाकला.

यावेळी वाहन चालक, क्लिनर यांना ताब्यात घेण्यात आले. पण, इतरांनी पोबारा केला..प्लास्टिक गोण्यांतुन रेशनचा तांदूळ विक्रीसाठी आणण्यात आला होता. या घटनेबाबत पोलिसांनी तहसीलदार कार्यालयात कळवल्यानंतर पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार भागवत ढोणे यांनी पुढील कारवाई केली.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here