Curraption : एक सामूहिक भ्रष्टाचाराचा प्रकार अहमदनगर जिल्ह्यात समोर आला असून या गुन्ह्यामध्ये बुधवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी व सह दुय्यम निबंधक अशा एकूण ६ अधिकारी व कर्मचारी यांचेसह ३२ खाजगी व्यक्तींवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम १३(१)(ड)सह भा.द.वि.कलम १६७,४२०,१०९ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान वरील सर्व गुन्हेगार असलेले अधिकारी, कर्मचारी हे २००६च्या दरम्यान अहमदनगर येथे कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, .३/१/२००६ ते दि.६/१/२००६ रोजी मौजे वडगांव गुप्ता शिवारात असलेल्या गट नं.२०३ (क्षेत्र २ हेक्टर, ९७ आर पोट खराबा ०.०९ आर. गट नं.२०५ एकुण क्षेत्र १ हेक्टर ३४ आर) ही कनिष्ट महार वतन हाडोळा (इनाम वर्ग ६ब) ची जमिन जुन्या शर्तीवर करण्यासाठी अटी व शर्तीवर अहमदनगरचे तत्कालीन तहसिलदार यांनी बेकायदेशीर परवानगी दिली होती. यातील लोकसेवक तत्कालीन तहसीलदार यांनी काढलेल्या आदेशाला तत्कालीन तलाठी, लोकसेवक दुर्गे, तत्कालीन मंडळ अधिकारी, नालेगांव यांनी मदत केली आहे व खरेदी विक्री व्यवहाराच्या नियमबाहय फेरफार- नोंदी घेवुन खाजगी इसम उत्कर्ष पाटिल व अजित लुकड यांना मदत केल्याची माहिती आहे. तसेच तत्कालीन अपर जिल्हाधिकारी अहमदनगर व्ही. टी. जरे व तत्कालीन उपविभागीय अधिकारी नगर भाग राजेंद्र मुठे याना सदरचा आदेश बेकायदेशीर असल्याची माहिती असुन देखील त्यांनी कुठलीही कारवाई न करता, बेकायदेशीर व्यवहारात सहभागी होवुन सदर व्यवहारास एक प्रकारे प्रोत्साहन दिले असल्याच सांगण्यात आलं आहे. तर दिलीप बबन निराली, तत्कालीन सह दुय्यम निबंधक, अहमदनगर- २ यांनी खरेदी विक्रीचे बेकायदेशीरपणे दस्त याप्रकरणी नोंदविले असून नमुद जमिनीचे भोगवटादार यांना सदरची जमिन हि महार वतन हाडोळा इनाम वर्ग ६ ची जमिन असल्याचे माहित असुन देखील त्यांनी वरील नमुद तहसिलदार यांना सदर जमिन जुन्या शर्तीवर करण्यासाठी अटी व शर्तीवर परवानगी द्यावी म्हणून मदत करुन, खोटे कागदपत्र तयार केले व सदर जमिनीची खरेदी विक्री व्यवहार करुन दस्त नोंदणी केली.
दरम्यान या जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर देखील फेरफार नोंदी घेतलेल्या आहेत व दस्त तयार करून शासनाची फसवणुक केली असल्याच समोर आलं आहे.
अशी आहेत आरोपींची नावे
१)तहसिलदार एल. एन. पाटिल, २) एल. एस. रोहकले, तत्कालीन तलाठी सजगांव गुप्ता ३) दुर्गे, तत्कालीन मंडळ अधिकारी, नालेगांव ४)व्ही. टी. जरे, तत्कालीन अपर जिल्हाधिकारी, अहमदनगर ५) राजेंद्र मुठे, तत्कालीन उपविभागीय अधिकारी, अहमदनगर विभाग, ६) दिलीप बबन निराली, तत्कालीन सह दुय्यम निबंधक, अहमदनगर- २, ७) दिनकर आनंदा शिंदे, ८) विनायक शंकर शिंदे, ९) बाबु आनंदराव शिंदे, १०) मोहन आनंदराव शिंदे, ११) वामन किसन शिंदे, १२) यादव किसन शिंदे, १३) सदाशिव केशव शिंदे, १४) रामभाऊ केशव शिंदे, १५) सुनिल केशव शिंदे, १६) यादव केशव शिंदे, १७) श्रीमती मालनबाई केशव शिंदे, १८) श्रीमती लता शांतवण भाकरे, १८)अरुण दगडु शिंदे, २०) शालनबाई दगडु शिंदे, २१) लक्ष्मण रामचंद्र शिंदे, २२) मथुरा विष्णु शिंदे, २३) संदिप विष्णु शिंदे २४) सुनिता रतन गायकवाड, २५) नंदा शाम घाटविसावे, २६) शालुबाई शाहुराव प्रभुणे, २७) मच्छिंद्र आनंदाव शिंदे, २८) लिलाबाई चंद्रभान पाडळे, २९ ) शोभा बुध्दीराम ठाकुर, तसेच संमती देणार ३० ) वत्सलाबाई तुकाराम पाचारणे, ३१) सुशिला शांतवण घाटविसावे ३२) तुळसाबाई मारुती नरवडे, ३३)छबुबाई भिवाजी साळवे, ३४) इंद्रायणी विठठल जाधव, ३५) वत्सला वामन जाधव, ३६) कौसल्या दामु जगताप यांचे जनरल मुखत्यार ३७) उत्कर्ष सुरेश पाटील, रा. श्रमिकनगर आनंदऋषीजी मार्ग अहमदनगर व जमिन खरेदी करणारे ३८ ) अजित कचरदास लुंकड, रा. आनंद दर्शन अपार्टमेंट, मार्केट यार्ड, अहमदनगर
दरम्यान या प्रकरणी एम.आय.डी.सी. पो.स्टे., जि.अहमदनगर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम १३(१)(ड) सह १३(२) सह भा.दं.वि. क.१६७ ४२० १०९ प्रमाणे दि.१९/०७/२०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप अधीक्षक श्री प्रविण लोखंडे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहमदनगर हे करीत आहेत.
सदर कारवाई ही मा. श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र, नाशिक मा. श्री. माधव रेडडी, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र, नाशिक व श्री नरेंद्र पवार, वाचक पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहमदनगरकडील पोलीस उप अधीक्षक श्री. प्रविण लोखंडे, पोलीस निरीक्षक श्री. राजु आल्हाट, पोहेकॉ संतोष शिंदे, पोकॉ रविंद्र निमसे, पोना विजय गंगुल यांचे पथकाने केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम