Political news : समाजवादी पक्षाचे आमदार आबु आझमी यांनी सभागृहात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याला राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोख उत्तर दिलंय.
अबू आझमी यांनी वंदे मातरम आम्ही म्हणणार नाही. आमचा धर्म आम्हाला त्याची मान्यता देत नाही. अस वक्तव्य केले होते. त्यानंतर सभागृहात मोठा गदारोळ झाला व कामजाक तहकूब करण्यात आले. या सर्व प्रकारानंतर सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आझमी यांना स्पष्ट शब्दात उत्तर दिले.
आझमी नक्की काय म्हणाले होते.
संभाजीनगर जिल्ह्यातील दंगलीचा मुद्दा उपस्थित करत आझमी म्हणाले की, ‘आज एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर मी लक्ष वेधत आहे. एक आफताब पुणवला होता, त्याने मुलीची हत्या केली आणि तिच्या धडाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले. यानंतर संपूर्ण देशभरात मुसलमानांविरुद्ध कारवाई सुरू झाली. माझ्या मराहाष्ट्रात अनेक जिल्ह्यामध्ये सकल हिंदू समाज आक्रोश रॅली निघू लागल्या. त्या रॅलिंमध्य मुसलमानांना एवढं अपमानित केलं की मुसलमानांपेक्षा मोठी देशद्रोही दुसरा कुणीच नाही. “‘जब गुलिस्तां को जरुरत पडी, सबसे पहले गर्दन हमारी कटी, अब ये हमसे कहते थे अहले चमन, ये चमन हमारा है तुम्हारा नही’. २९ मार्चच्या सायंकाळी ५ वाजता औरंगाबादमध्ये तीन व्यक्ती राममंदीराजवळ मोटरसायकलवरून आले. त्यांनी ‘इस देश मे रहेना है, तो वंदे मातरम कहना होगा’ अशा घोषणा दिल्या. अध्यक्ष महोदय आम्ही वंदे मातरम म्हणू शकत नाही. कारण आम्ही फक्त अल्लाहला मानतो, जगात कोणासमोरही आम्ही डोकं टेकवू शकत नाही. आईसमोरही आम्ही डोकं टेकत नाही. आमचा धर्म याची अनुमती देत नाही. तिथे तरुणांनी या घोषणा दिल्यानंतर परिस्थिती बिघडली. पोलिस आले आणि त्यांनी दोन्ही गटांना पांगवलं, पण रात्री पुन्हा १५ ते २० लोक आले आणि घोषणाबाजी सुरू केली. यामुळे मुस्लिम देशद्रोही असल्या सारख त्यांना वागवलं जात असल्याचे आझमी म्हणाले होते.
फडणवीस यांनी आझमींना दिले असे उत्तर
ऐसा कोई भी मज़हब नहीं कहता की अपनी माँ के सामने सिर मत झुकाओ !
करोडो लोकांची वंदे मातरम् वर श्रध्दा !
ते संविधानाने स्वीकारलेले राष्ट्रगान !
राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान या सभागृहात सुद्धा आपण म्हणतो.
असा कोणता धर्म नाही, जो सांगतो आपल्या मातेसमोर झुकू नका, मुस्लिम धर्म सुद्धा हे सांगत नाही. वंदे मातरम् हे धार्मिक गान नाही, तर राष्ट्रगौरव !
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम