Bageshwar baba : बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री अडचणीत ; महिलांविषयी केलं वादग्रस्त वक्तव्य

0
13

Bageshwar dham : बागेश्वर बाबा म्हणून ओळखले जाणारे धीरेंद्र शास्त्री त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीकेचा झोड उठली आहे. आणि ते विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. काही दिवसांपूर्वी आपल्या प्रवचनामध्ये त्यांनी एखादी महिला विवाहित असेल तर तिच्या दोन ओळखी असतात. भांगे मध्ये कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र मात्र भांगेत कुंकू नसेल आणि गळ्यात मंगळसूत्र नसेल तर आम्ही लोक हा प्लॉट अजून रिकामा आहे असं समजतो. अस वक्तव्य धिरेंद्र शास्त्री यांनी केलं होतं.

 

यामुळे नरेंद्र शास्त्री यांच्यावर विविध स्तरातून टीका केली जात आहे यात निगर परविन या ट्विटर युजरने कमेंट करत बाबा म्हणतायेत “ज्या महिलेच्या भांगेत कुंकू नाही आणि गळ्यात मंगळसूत्र नाही. त्यांना लोक समजतात अजून प्लॉट रिकामा आहे” यांच्या दरबारात चिठ्ठी खोलल्या नंतर पत्रकार जयजयकार करतात, पोलीस अधिकारी वर्दीवर त्यांच्या पाया पडतात आणि त्यांचे असे विचार आहे.

 

या व्हिडिओमध्ये बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री पुढे म्हणतात की, भांगेत कुंकू असेल, गळ्यात मंगळसूत्र असेल तर आम्ही लोक दुरूनच पाहून समजून घेतो की रजिस्ट्री झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे या व्हिडिओवर प्रवचन ऐकणाऱ्या अनेक महिला टाळ्या वाजवत हसत असल्याचे देखील बघायला मिळतं. मात्र सोशल मीडियावर काही महिलांकडून या वक्तव्यावर रोष व्यक्त केला जात आहे.

 

सुजाता नावाच्या एका महिलेने यावर प्रतिक्रिया देत लिहिल आहे की, कोण कोणते प्लॉट रिकामे आहेत. आम्हालाही जाणून घ्यायचा आहे. तुम्हीही घाला मंगळसूत्र आणि भांग भरा. चोराला बाबा बनवले आहे. आम्ही महिला कोणत्या समाजात राहतो लाज वाटते खरोखरच दुर्दैवी आहे.

 

धीरेंद्र शास्त्री यांना कट्टर हिंदुत्ववादी म्हणून ओळख आहे. तर त्यांच्या दरबारात अर्जी लावणाऱ्यांपैकी ज्यांचा नंबर लागतो ते व्यासपीठावर येण्याआधीच बाबा त्यांच्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरं चिठ्ठी मध्ये लिहून ठेवतात. यामुळे त्यांच्या दरबारात लाखोंच्या संख्येने भाविक बघायला मिळतात. मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर संताप व्यक्त केला जात आहे. तर असे बोलणारे ना संत असू शकतात ना कथाकार अशा प्रकारच्या कमेंट्स देखील केल्या जात आहेत. तर बाबांच्या या वक्तव्यावर सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here