Pandharpur : चंद्रभागा नदीमध्ये बुडणाऱ्या दोघा भाविकांचा पंढरपूर नगरपरिषदेच्या गस्तीपथकाने जीव वाचवला आहे.
काल संपूर्ण राज्यामध्ये आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. यावर्षी जवळपास दहा लाखांहून अधिक वारकरी आणि भाविक भक्तांनी पंढरपूरला जात विठूरायाचं दर्शन घेतलं आहे. आषाढी यात्रेनिमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने चंद्रभागा नदीमध्ये स्नान करून विठ्ठल रुक्मिणीच दर्शन घेतलं, याच यात्रेमध्ये कृष्णा भंडारे आणि एक भाविक चंद्रभागेच्या तीरावर स्नान करत होते. यावेळी पाण्याचा व त्याच्या खोलीचा त्यांना अंदाज आला नाही यामुळे हे दोघेही भाविक पाण्यात बुडायला लागले.
दरम्यान या ठिकाणी नगरपरिषदेच्या नदीपात्रामध्ये गस्त घालत असलेल्या पथकातील गणेश तारे व अक्षय भोसले यांनी नदीपात्रात तातडीने उडी घेत लाईफ रिंग देऊन दोरीच्या साह्याने या दोनही भाविकांचा जीव वाचवला असल्याची माहिती अग्निशमन अधिकारी संभाजी कारले यांनी दिली आहे.
चंद्रभागेचे नदीपात्र खोल असल्यामुळे या ठिकाणी नागरिकांनी पाण्याचा अंदाज घेऊन पाण्यात उतरावं अशा सूचना स्पीकर द्वारे दिल्या जात होत्या, तर कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून नगरपरिषेकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात होते. यासाठी नगरपरिषदेची आपत्कालीन टीम ही पहाटे पासून रात्रीपर्यंत नदीपात्रामध्ये गस्त घालत होती. तरीही काही भाविकांकडून सूचनांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं निदर्शनात येत होतं, यावेळी अनेक भाविक खोल पाण्यात जाऊन स्नान करत असल्याचं यावेळी स्नान करत असल्याचं बघायला मिळालं. यामुळे नागरिकांनी आपल्या जीवाची काळजी घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्याकडून करण्यात आलं होतं.
दरम्यान ज्या कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून भाविकांचा जीव वाचवला त्या कर्मचाऱ्यांचे देखील मंदिर प्रशासन मुख्याधिकारी अरविंद माळी, उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांच्यातर्फे अभिनंदन देखील करण्यात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम